जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांच्या घरावर CBI ची छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सत्यपाल मलिक यांच्या घरासह ३० हून अधिक ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती एएनआयने X वर दिली आहे. (CBI Raids In J & K) … The post जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांच्या घरावर CBI ची छापेमारी appeared first on पुढारी.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांच्या घरावर CBI ची छापेमारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सत्यपाल मलिक यांच्या घरासह ३० हून अधिक ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती एएनआयने X वर दिली आहे. (CBI Raids In J & K)

CBI conducts raids at more than 30 places, including the premises of former Jammu and Kashmir Governor Satyapal Malik, as part of its investigation into alleged corruption linked to the awarding of a Kiru Hydroelectric project contract in the UT: Sources
— ANI (@ANI) February 22, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, किरू जलविद्युत प्रकल्पाचे कंत्राट देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून त्याच्या तपासासंदर्भात सीबीआयचे पथक माजी राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचले होते. सत्यपाल मलिक यांनीच या घोटाळ्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. (CBI Raids in J & K)
2019 मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे 2,200 कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने डिसेंबरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. या लोकांमध्ये कंपनीशी संबंधित कंवलजीत सिंग दुग्गल आणि डीपी सिंग यांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर छापा टाकण्यात आला. सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत आरोप केला होता की, या प्रकल्पासह दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना २०० कोटींची ऑफरही देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती फेटाळली होती. (CBI Raids in J & K)

#WATCH | CBI is conducting raids at more than 30 places, including the premises of former Jammu and Kashmir Governor Satyapal Malik, as part of its investigation into alleged corruption linked to the awarding of a Kiru Hydroelectric project contract in the UT: Sources
(Outside… pic.twitter.com/zDM8YixyI4
— ANI (@ANI) February 22, 2024

हेही वाचा:

Supriya Sule Post : “त्या मतदारसंघाचे नाव बारामती…” : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

Latest News on Power Generation | राज्यात रुफटॉपद्वारे १९०० मेगावॉट वीजनिर्मिती

Nashik Water Cut Update | नाशिककरांना मोठा दिलासा, तूर्तास तरी पाणीकपात नाही

Latest Marathi News जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांच्या घरावर CBI ची छापेमारी Brought to You By : Bharat Live News Media.