साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह आरोपी ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर मार्गावर एका पिकअपमधून साडेचार लाख रुपयांच्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा मिळून आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व गुटख्यासह बोलेरो पिकअप असा एकूण ६ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेश मधून किराणा सामानासह एका पिकअप वाहनातून … The post साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह आरोपी ताब्यात appeared first on पुढारी.

साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह आरोपी ताब्यात

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर मार्गावर एका पिकअपमधून साडेचार लाख रुपयांच्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा मिळून आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व गुटख्यासह बोलेरो पिकअप असा एकूण ६ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मध्यप्रदेश मधून किराणा सामानासह एका पिकअप वाहनातून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर रस्त्यावरून गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बुधवार, दि. 21 च्या मध्यरात्री मध्यप्रदेशातून येणाऱ्या किराणा मालाच्या पिकअप वाहनातून शेंदवाकडून धुळेकडे जाणाऱ्या चोपडा शिरपूर मार्गावरील हातेड फाटा या ठिकाणी पोलीसांनी सापळा लावला. यावेळी पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाणाची तपासणी पोलीसांनी केली असता त्यामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला १ लाख ९४ हजार ४८० रुपये किमतीचा विमल पान मसाला, ३४ हजार ३२० रुपये कीमतीचा सुगंधीत तंबाखू व ४ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण ६ लाख ७८ हजार रुपये किमतीचा माल घेऊन जात असलेली चारचाकी जप्त करण्यात आली. वाहनासोबतच आरोपी प्रशांत मानीको भिल (रा. हेकंयवाडी ता. जि. धुळे) यास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीस मुददेमाल व वाहनासह अटक केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहायक पोलीस निरीक्षक नितनवरे, पोलीस कॉन्सटेबल शशी पारधी, मनीश गावीत, संदिप निळे यांनी केली आहे.
Latest Marathi News साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह आरोपी ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.