शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवस स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली चलो मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी सायंकाळी घेतला. येत्या दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे संघटनेने सांगितले. शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांना रोखताना पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा, यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. राजधानी दिल्लीकडे कूच करत असलेल्या … The post शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवस स्थगित appeared first on पुढारी.

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवस स्थगित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली चलो मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी सायंकाळी घेतला. येत्या दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे संघटनेने सांगितले. शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांना रोखताना पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.
शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा, यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. राजधानी दिल्लीकडे कूच करत असलेल्या शेतकऱ्यांना शंभू सीमेवर रोखण्यासाठी पोलिसांकडून बुधवारी अश्रुधुरासह रबरी गोळ्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. या धुमश्चक्रीत एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी नेते जगजित डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, हे आंदोलन चिघळत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी येथे झालेल्या चकमकीत एक आंदोलक मारला गेला आणि १२ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा केल्यानंतर बुधवारी शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची संघटना संयुक्त किसान मोर्चा (SKM) गुरुवारी राष्ट्रीय समन्वय समिती बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा करणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
हेही वाचा : 

युवा शेतकर्‍याचा मृत्यू; आंदोलन चिघळले
सरकारचा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचा प्रस्ताव
मानवाला अंतराळात घेऊन जाणार्‍या इंजिनची चाचणी यशस्वी

Latest Marathi News शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवस स्थगित Brought to You By : Bharat Live News Media.