तू मला आवडतेस, मोबाईल नंबर दे ! शाळकरी मुलीचा विनयभंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देऊन भेटण्याची जबरदस्ती केली. दरम्यान, हा प्रकार मुलीच्या वडिलांना समजला असता, त्यांनी याबाबत संबंधित मुलाला जाब विचारला असता, त्यांनादेखील त्याने शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 16 वर्षीय … The post तू मला आवडतेस, मोबाईल नंबर दे ! शाळकरी मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

तू मला आवडतेस, मोबाईल नंबर दे ! शाळकरी मुलीचा विनयभंग

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देऊन भेटण्याची जबरदस्ती केली. दरम्यान, हा प्रकार मुलीच्या वडिलांना समजला असता, त्यांनी याबाबत संबंधित मुलाला जाब विचारला असता, त्यांनादेखील त्याने शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 16 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. ही घटना जून 2023 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती आणि आरोपी अल्पवयीन मुलगा एकमेकांच्या परिचयाचे आहेत. युवती क्लासेसला जात असताना तो तिचा पाठलाग करत असे. त्याने युवतीला ‘तू मला आवडतेस, तुझा मोबाईल नंबर दे,’ असे म्हटले. युवती घाबरून क्लासमध्ये जाऊन बसली. त्यानंतर आरोपीने चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक लिहून देऊन फोन नाही केलास, तर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, अशी धमकी दिली होती. तसेच आरोपीने युवतीला अश्लील शिवीगाळ करून तिच्या मनाशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी
तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. मुलगी तणावाखाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वडिलांनी तिला विचारणा केली. त्या वेळी तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्यांनादेखील त्याने शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर युवतीने खडक पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देवकर करीत आहेत.
हेही वाचा

Nashik | दिव्यांग प्रमाणपत्रांवरुन सीईओ ॲक्शन मोडवर
दिलादायक बातमी | जिल्हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात पाच दिवस पावसाचे

Latest Marathi News तू मला आवडतेस, मोबाईल नंबर दे ! शाळकरी मुलीचा विनयभंग Brought to You By : Bharat Live News Media.