हाडे खिळखिळी, तरीही ‘रम्बलर’चा सोस! शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधकांची मागणी  

 पुणे : मोठमोठे उंचवटे असणार्‍या आणि वाहनचालकांचा प्राण कंठाशी आणणार्‍या गतिरोधकांच्या जागी शास्त्रीय पद्धतीचे, कमी वेगात त्रास न देणारे गतिरोधक देण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र शहराच्या अनेक ठिकाणी वाहन आणि वाहनचालकांचे मणके यांची परीक्षा घेणारे रम्बलर सर्रास उभारण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. हे रम्बलर हटवून तिथेही शास्त्रीय गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून … The post हाडे खिळखिळी, तरीही ‘रम्बलर’चा सोस! शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधकांची मागणी   appeared first on पुढारी.
हाडे खिळखिळी, तरीही ‘रम्बलर’चा सोस! शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधकांची मागणी  

हिरा सरवदे

 पुणे : मोठमोठे उंचवटे असणार्‍या आणि वाहनचालकांचा प्राण कंठाशी आणणार्‍या गतिरोधकांच्या जागी शास्त्रीय पद्धतीचे, कमी वेगात त्रास न देणारे गतिरोधक देण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र शहराच्या अनेक ठिकाणी वाहन आणि वाहनचालकांचे मणके यांची परीक्षा घेणारे रम्बलर सर्रास उभारण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. हे रम्बलर हटवून तिथेही शास्त्रीय गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.

शहरात वेगवेगळ्या आकाराचे आणि उंचवट्याचे गतिरोधक असल्याने त्याचा वाहनचालकांना त्रास होत होता. अनेक गतिरोधक रंगवलेच न गेल्याने मोठा अपघात होण्याचीही भीती होती. त्या विरोधात आवाज उठवण्यात आल्याने महापालिकेने अखेरीस शास्त्रीय गतिरोधक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनाचा वेग कमी असेल, तर वाहन कमी वेगाने गतिरोधकावरून जात असताना वाहनचालकाला काहीही त्रास होता कामा नये, अशी गतिरोधकांची रचना इंडियन रोड काँग्रेसने केली आहे. तसे गतिरोधक बसवण्याची योजना महापालिकेने आखली आहे.

महापालिका एका बाजूने असा स्तुत्य निर्णय करत असतानाच दुसरीकडे मात्र अनेक रस्त्यांवर नव्याने रम्बलर उभारत आहे. उंचवटा असलेल्या या पांढर्‍या पट्ट्यांवरून वाहन कितीही कमी वेगात  गेले तरी वाहन खिळखिळे होते. तसेच वाहनचालकाच्या पाठीचा मणकाही शेकून निघतो. त्यातून मणक्याचे मोठे आजार होण्याची भीती असते. कोणताही विचार न करता उभारण्यात येणार्‍या या रम्बलरना ताबडतोब काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

महापालिकेने विविध रस्त्यांवर मारलेल्या रम्बलरच्या पांढर्‍या पट्ट्यांमुळे मणका व मानेला त्रास होतो. शिवाय दुचाकींचेही नुकसान होत आहे. एकाच ठिकाणी वारंवार पट्ट्या मारल्या जात असल्याने उंचवटे निर्माण झाले आहेत. गतिरोधकप्रमाणे रम्बलरवरही प्रशासनाने विचार करावा.

– महादेव माळी, तळजाई.

शाळा, चौक, रस्ते दुभाजक आणि वाहनांची गती वाढण्याची ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार गतिरोधक व रम्बलर करण्यात आले आहेत. नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होईल, असे गतिरोधक व रम्बलर काढण्याच्या सूचना केल्या आहेत.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

अशास्त्रीय गतिरोधक व रम्बलरमुळे मणका दबणे, मानदुखीस, हेल्मेट असेल, तर मानेला जोराचा धक्का बसतो. यामुळे स्नायू दबणे, मज्जारज्जू दबणे, स्पॉन्डेलायसिस यांसारखे आजार उद्भवू शकतात.

– डॉ. सिद्धार्थ शिंदे, शिंदे नर्सिंग होम, भवानी पेठ.

अर्धा किलोमीटर अंतरामध्ये 13 रम्बलर
पर्वती पोलिस ठाण्यापासून ते पर्वती पायथ्यापर्यंतच्या अर्ध्या किलोमीटर अंतरामध्ये तब्बल 13 रम्बलर असून, त्यातील काही नव्याने उभारलेले आहेत. त्यात एके ठिकाणी रम्बलर आणि गतिरोधक एकामागोमाग एक ओळीने आहेत. तसेच, त्याच्या जवळच असलेल्या गजानन महाराज मठासमोरील रस्त्यावर तर चक्क रम्बलर-गतिरोधक एकमेकांना खेटूनच आहेत. कसेही करून वाहनचालकांचे हालच झाले पाहिजेत, हा उद्देश यामागे आहे का, अशी शंका वाहनचालक व्यक्त करीत आहेत. कितीही हळू गेले तरी कंबर शेकवणारे सगळे रम्बलर काढा आणि त्याजागी वाहनाचा वेग कमी केल्यास वाहनचालकाला त्रास होणार नाही, अशा शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवा, अशी मागणी त्यांच्याकडून होते आहे.
अपघातांचा धोका
रस्त्यावर रम्बलर दिसताक्षणीच अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अचानक आपल्या वाहनांची गती कमी करतात. अशावेळी मागून आलेले वाहन त्याला धडकण्याची शक्यता असते. रम्बलर बसविलेल्या ठिकाणी असे प्रकार अनेकदा घडले आहेत तसेच रोज घडत आहेत.

हेही वाचा

दिलादायक बातमी | जिल्हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात पाच दिवस पावसाचे
नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Latest Marathi News हाडे खिळखिळी, तरीही ‘रम्बलर’चा सोस! शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधकांची मागणी   Brought to You By : Bharat Live News Media.