नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची … The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : Bharat Live News Media वृत्तसेवा
वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची कुटी तयार करीत होते. यावेळी त्यांना सर्पदंश झाला. त्यांना तातडीने देवळा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी जाधव यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वाखारवाडी येथे राहत्या ठिकाणी जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने वाखारवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे . तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संदीप चौधरी करीत आहेत.
Latest Marathi News नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.