तडका : ग्लॅमरची फोडणी..!

यशस्वी जैस्वाल या नवोदित क्रिकेटपटूने नुकतीच दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके लगावली आहेत. त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे भलेभले दिग्गज माजी कसोटीपटू भारावून गेलेले आहेत. याचा अर्थ यशस्वी हा भारताच्या क्रिकेट क्षितिजावर उगवलेला नवीन तारा आहे. एखादी व्यक्ती यश मिळवून माध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली की, ती राहणार कुठली आहे किंवा पूर्वी काय करत होती, याची माहिती … The post तडका : ग्लॅमरची फोडणी..! appeared first on पुढारी.

तडका : ग्लॅमरची फोडणी..!

यशस्वी जैस्वाल या नवोदित क्रिकेटपटूने नुकतीच दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके लगावली आहेत. त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे भलेभले दिग्गज माजी कसोटीपटू भारावून गेलेले आहेत. याचा अर्थ यशस्वी हा भारताच्या क्रिकेट क्षितिजावर उगवलेला नवीन तारा आहे. एखादी व्यक्ती यश मिळवून माध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली की, ती राहणार कुठली आहे किंवा पूर्वी काय करत होती, याची माहिती काढली जाते. यशस्वी जैस्वालने कधीच पाणीपुरीचा ठेला लावलेला नाही, हे सांगता-सांगता त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्या नाकी नऊ आले आहेत. यशस्वी जैस्वाल पाणीपुरी विकत होता, अशी काहीशी बातमी कोणीतरी सोडून दिली आणि मग यशस्वी जैस्वालच्या क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा त्याच्या पाणीपुरी विकण्याला ग्लॅमर प्राप्त झाले.
रिक्षावाल्याची मुलगी आयएएस झाली किंवा प्लंबरची मुलगी पोलीस इन्स्पेक्टर झाली या बातम्या लक्ष वेधून घेणार्‍या असतात. अत्यंत गरिबीत जीवन कंठणार्‍याने उत्तुंग असे यश मिळवले की, लोकांना त्याचे कौतुक वाटणे सहाजिक आणि स्वाभाविक आहे, त्यात काही चूक नाही. त्याचबरोबर अतिश्रीमंतीचेही कौतुक असते. उदाहरणार्थ, शुभमन गिल हा क्रिकेटपटू एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा आहे, याचीही भरपूर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर यशस्वी जैस्वालचे पाणीपुरी विकणे चर्चेत आले नसते तरच नवल होते. त्याने खरेच पाणीपुरी विकली असती तर तशी चर्चा व्हायला हरकत नव्हती; पण यशस्वीची कहाणी मात्र वेगळीच आहे.
त्याच्या वडिलांचे उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना यशस्वीसहित एकूण सहा मुले आहेत. यशस्वी हा त्यांचा चौथा मुलगा. हा मुंबईमध्ये त्याच्या काकांकडे राहण्यासाठी आला. तिथे त्याने पडेल ती कामे केली. क्वचित प्रसंगी आझाद मैदानावरसुद्धा झोपला. तिथे तो मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असे. क्रिकेट खेळून झाल्यानंतर तो मित्रांबरोबर पाणीपुरी खायला जात असे, एवढाच काय तो त्याचा आणि पाणीपुरीचा संबंध आहे. ज्वाला सिंग यांची सांताक्रूज येथे क्रिकेट अकादमी आहे. त्यांनी एकदा यशस्वीला क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्याच्यामध्ये एक वेगळी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. 2013 मध्ये यशस्वीच्या वडिलांनी ज्वाला सिंग यांना त्याला क्रिकेट शिकवण्याची विनंती केली. ते म्हणाले की, त्याच्याकडून मेहनत करून घ्या, वाटेल ती कामे करून घ्या; पण याचा शिष्य म्हणून स्वीकार करा. ज्वाला सिंग यांनी यशस्वीला आपल्या अकादमीत भरती करून घेतले. यशस्वीला जवळपास दत्तक घेतल्यासारखे त्यांनी त्याची पॉवर ऑफ ऑफ अटॅर्नीही स्वतःकडे घेतली. तशी कागदपत्रे करून घेतल्यानंतर यशस्वीचे कठोर प्रशिक्षण सुरू झाले. यशस्वीचे वडील प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना दर महिना एक हजार रुपये पाठवत असत. 2013 मध्ये प्रशिक्षणास सुरुवात केलेला यशस्वी खर्‍या अर्थाने यशस्वी होण्यासाठी 2024 साल उजेडावे लागले.
अशी संघर्षाची पार्श्वभूमी बर्‍याच खेळाडूंची, गायकांची, संगीतकारांची, अभिनेत्यांची असते. त्याला जर गरिबीचे ग्लॅमर असेल, तर ती अधिक झळकून निघते. प्रत्येक गोष्टीची जाहिरात करणे आणि बातमीकडे लक्ष वेधून घेणे यासाठी काय केले जाईल, याचा काही नेम नाही.
                                                                                                                                                            कलंदर
Latest Marathi News तडका : ग्लॅमरची फोडणी..! Brought to You By : Bharat Live News Media.