मनोज जरांगे-पाटील यांचे एक दिवसाचे मौन, कारण काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस मराठा आरक्षण आंदोलन खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केली आहे की, ते एक दिवसांचे मौन बाळगणार आहेत. बदनामीकारक आरोपानंतर जरांगे पाटील यांनी ही  घोषणा केली आहे. जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Maratha reservation-Manoj Jarange patil) मनोज जरांगे पलटी … The post मनोज जरांगे-पाटील यांचे एक दिवसाचे मौन, कारण काय? appeared first on पुढारी.

मनोज जरांगे-पाटील यांचे एक दिवसाचे मौन, कारण काय?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस मराठा आरक्षण आंदोलन खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केली आहे की, ते एक दिवसांचे मौन बाळगणार आहेत. बदनामीकारक आरोपानंतर जरांगे पाटील यांनी ही  घोषणा केली आहे. जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Maratha reservation-Manoj Jarange patil)
मनोज जरांगे पलटी मारणारे, खोटे बोलणारे : बारस्कर महाराज
मनोज जरांगे कायम पलटी मारतात आणि खोटे बोलतात, असा आरोप करत जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय बारस्कर महाराज यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी (दि.२) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले, “मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मधल्या काळामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जी घटना घडली, त्यानंतर मी आंदोलनाच्या या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदणीसाठी मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळेच मी जरांगे यांच्यासोबत सहभागी झालो होतो. मात्र, यापूर्वी कधीच मी माध्यमांसमोर आलो नाही. जरांगे अत्यंत हेकेखोर माणूस असून, ते कायम पलटी मारतात. एवढेच नव्हे, तर सतत खोटे बोलतात, अशा आरोपांच्या फैरी बारस्कर यांनी झाडल्या.
जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून खदखद होती. ती मी व्यक्त करत आहे. यामुळे मला गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकार्‍यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. त्याचाही मी साक्षीदार आहे. लोणावळा, वाशी येथेही मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या. अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा दावादेखील बारस्कर महाराज यांनी केला आहे.
Maratha reservation-Manoj Jarange patil : राज्यव्यापी रास्ता रोको
मराठा आरक्षणासाठी आंदोलन शांततेत सुरु राहील, असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (दि.२४) पासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, ३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल, अशी माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत दिली. (Manoj Jarange appeal For Rasta Roko Movement )
Maratha reservation : जरांगे-पाटील यांनी केलेले आवाहन

येत्या २४ फेब्रुवारीपासुन (रविवारी) राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करावे
२४ फेब्रवारीपासून दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान रास्‍ता राेकाे आंदोलन करावे. ज्यांना ही वेळ जमत नसेल त्यांनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत करावे.
आंदोलन शांततेत पार पडेल याची काळजी घ्यावी.
आमदारांना गावबंदी नाही, मात्र कोणताही राजकीय नेता दारी आला की दार बंद करावे.
रोज रास्ता रोको आंदोलन करुन सरकारला निवेदने द्यावे.
आंदोलन दरम्यान कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करु नये.
कायदा, आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
मराठा समाजातील सर्व वृद्धांनीही या आंदोलनाला बसावे.
आंदोलनाला बसताना एका रांगेत सर्वांनी उपोषणाला बसावे.
१ मार्च रोजी राज्यभरातील मराठा लोकप्रतिनिधींची बैठक होईल.
३ मार्च राेजी जगातील सर्वात मोठा रास्ता रोको आंदोलन करा.
राज्यात ३ मार्च राेजी सर्व जिल्ह्यात सकाळी १२ ते १ रास्‍ता राेकाे आंदोलन करावे.
३ मार्चच्या रास्ता रोकाेनंतर  मुंबईतील आंदोलनाची दिशा स्पष्ट करु.

हेही वाचा : 

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री
विधीमंडळ विशेष अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Maratha Aarakshan: मराठा आरक्षणावरून समाधान अन् संताप
Maratha reservation : …अन्यथा त्यांचे कपडे ठिगळासारखे असते : जरांगे-पाटील यांचा मुख्‍यमंत्र्यांवर हल्लाबाेल

Latest Marathi News मनोज जरांगे-पाटील यांचे एक दिवसाचे मौन, कारण काय? Brought to You By : Bharat Live News Media.