Kurkumbh Drugs Case : केमिकल इंजिनिअरच्या मदतीने मेफेड्रॉनची निर्मिती

पुणे : मेफेड्रॉन तयार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला भीमाजी ऊर्फ अनिल साबळे हा अर्थ केम लॅबोरटरी कंपनीचा मालक आहे. त्याने केमिकल इंजिनिअर युवराज भुजबळच्या मदतीने मेफेड्रॉनचा फॉर्मुला आणि कच्चा माल तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांच्या न्यायालयाने दोघांना 29 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश … The post Kurkumbh Drugs Case : केमिकल इंजिनिअरच्या मदतीने मेफेड्रॉनची निर्मिती appeared first on पुढारी.

Kurkumbh Drugs Case : केमिकल इंजिनिअरच्या मदतीने मेफेड्रॉनची निर्मिती

पुणे : मेफेड्रॉन तयार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला भीमाजी ऊर्फ अनिल साबळे हा अर्थ केम लॅबोरटरी कंपनीचा मालक आहे. त्याने केमिकल इंजिनिअर युवराज भुजबळच्या मदतीने मेफेड्रॉनचा फॉर्मुला आणि कच्चा माल तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांच्या न्यायालयाने दोघांना 29 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख यांना अटक केली आहे.
कुरकुंभमध्ये मेफेड्रॉन या अंमली पदार्थाच्या निर्मितीप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. या वेळी, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून मेफेड्रॉन तयार केले? मेफेड्रॉन कोणाला दिले? किती तयार केले? मेफेड्रॉनची निर्मिती करण्यासाठी लागणार कच्चा माल कोठून आणला? आदी तपास करायचा आहे. तसेच, साबळे आणि भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉनची निर्मिती केली असून, साथीदारांमार्फत भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठविला आहे. तसेच, हे आरोपी इतर आरोपींच्या कसे संपर्कात आले, याची चौकशी करायची असल्याने 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली. बचाव पक्षाच्या वतीने आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 29 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फॉर्म्युला देऊन बनवला माल
भुजबळला एक प्रॉडक्ट बनवून द्यायचा आहे, त्याकरिता भुजबळ कच्चा माल पुरवणार असून, फॉर्म्युल्याप्रमाणे प्रोडक्ट बनवायचा असल्याचा आदेश साबळे याने कामगारांना दिला होता, अशी माहितीही वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी न्यायालयात दिली.
हेही वाचा

काजू बोंड रसावर प्रक्रियेसाठी ब्राझील तंत्रज्ञान
मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार : नाना पटोले
बारावीच्या पहिल्याच पेपरला राज्यात कॉपी बहाद्दरांची चलती !

Latest Marathi News Kurkumbh Drugs Case : केमिकल इंजिनिअरच्या मदतीने मेफेड्रॉनची निर्मिती Brought to You By : Bharat Live News Media.