बारावीच्या पहिल्याच पेपरला राज्यात कॉपी बहाद्दरांची चलती !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला राज्यात 58 कॉपी केसेसची नोंद झाली. भरारी पथकांकडून या कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. राज्य मंडळाच्या अंतर्गत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांच्या माध्यमातून इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जात आहे.
मात्र, तरीही पहिल्याच पेपरला 58 विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळून आले. सर्वाधिक केसेसची नोंद छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात झाली. मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागात परीक्षेदरम्यान एकही कॉपीची नोंद झाली नाही. राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 26, पुणे विभागीय मंडळात 15, लातूर विभागीय मंडळात 14, नाशिक विभागीय मंडळात 2, तर लातूर विभागीय मंडळात 1 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली, असे मंडळाकडून कळविण्यात आले.
वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. काही किरकोळ प्रकार वगळता मतदान केंद्रांवर शांतता होती. संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. सकाळच्या सत्रातील पेपर असल्याने वेळेत केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ उडाली. शहरातील वाहतूक कोंडीचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला.
हेही वाचा
Kurkumbh Drugs Case : कुरकुंभच्या ड्रग्जला लंडनची बाजारपेठ
कुपवाडमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची कारवाई
धक्कादायक ! प्रसिध्द कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन
Latest Marathi News बारावीच्या पहिल्याच पेपरला राज्यात कॉपी बहाद्दरांची चलती ! Brought to You By : Bharat Live News Media.
