धक्कादायक ! प्रसिध्द कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन

पुणे : प्रसिध्द कवी, गझलकार , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह, दीपक करंदीकर यांचे रात्री 12:30 वाजता दुःखद निधन झाले. आठ दिवस त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीपक करंदीकर कवी, गझलकार व लेखक म्हणून चार दशकांपासून सुपरिचित आहेत. मराठी साहित्यविश्वातील महाराष्ट्र साहित्य … The post धक्कादायक ! प्रसिध्द कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन appeared first on पुढारी.

धक्कादायक ! प्रसिध्द कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन

पुणे : प्रसिध्द कवी, गझलकार , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह, दीपक करंदीकर यांचे रात्री 12:30 वाजता दुःखद निधन झाले. आठ दिवस त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीपक करंदीकर कवी, गझलकार व लेखक म्हणून चार दशकांपासून सुपरिचित आहेत.
मराठी साहित्यविश्वातील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे ते स्थानिक कार्यवाह होते. हे पद ते गेली तीस वर्षे भूषवित आले होते. ‘धुनी गझलांची’ (2001), ‘कविकुल’ (2009) हे गझलसंग्रह व कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, ‘गझलगंगा’ हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच, ‘अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य’ (2016), ‘संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह नाट्य’ – पाच अंकी संगीत नाटक (2020) ही श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. करंदीकर गेल्याने साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे अशी भावना जनमानसातून उमटत आहे.
हेही वाचा

Manoj Jarange Patil : राज्यात शनिवारपासून गावोगावी रास्ता रोको, आंदोलन तीव्र करणार : मनोज जरांगे
Andhra Pradesh : चार महिन्यांची मुलगी ओळखते १२० वस्तू!
Prakash Ambedkar : आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

Latest Marathi News धक्कादायक ! प्रसिध्द कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे दुःखद निधन Brought to You By : Bharat Live News Media.