यवतमाळ : हुडा बु. ग्रामपंचायतीत १४ लाखांचा भ्रष्टाचार; महिला सरपंच, ग्रामसेविकेला अटक

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : पुसद तालुक्याताल हुडा बु.ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेविकेने संगनमत करून तब्बल १४ लाख ३४ हजार ३६६ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोपात तथ्य आढळल्याने, पुसद ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांची वाशिमच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सरपंच अनुराधा कान्हेकर व ग्रामसेविका अनिता आगाशे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. हुडी (बु.) ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अनुराधा कान्हेकर व ग्रामसेविका अनिता आगाशे यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी संबंधित कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या होत्या. कारवाई होत नसल्याने उपोषणही केले होते. जवळपास दोन वर्षांच्या चौकशीनंतर ग्रामीण पोलिसांनी सरपंच व ग्रामसेविकेला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या महिला सरपंच व ग्रामसेविकेची वाशिमच्या कारागृहात रवानगीही केली आहे.
माजी सरपंच संतोष दरने यांनी २८ मार्च, २०२२ पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणही केले होते. तत्कालीन सरपंच व ग्रामसेविकेने हुडी (बु.) ग्रामपंचायतमध्ये सन २०१८-२०१९ मध्ये दलित वस्ती, तंटामुक्त मुक्त गाव, पाणीपुरवठा निधी, स्वच्छ भारत मिशन या योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे काही पुरावे आहेत. तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचासह सदस्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती. सरपंच व ग्रामसेविकेने १४ लाख ९१ हजार २३८ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत आढळल्याने, दोघींनाही ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीट जमादार इंदल आडे यांनी अटक केली. सरपंचासह ग्रामसेविकेवर कारवाई केल्याने तालुक्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Latest Marathi News यवतमाळ : हुडा बु. ग्रामपंचायतीत १४ लाखांचा भ्रष्टाचार; महिला सरपंच, ग्रामसेविकेला अटक Brought to You By : Bharat Live News Media.
