जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- जितेंद्र ऑटोमोबाइल्स व महिंद्रा जितेंद्र मोटर्सचे संचालक जितेंद्र शहा (वय ६८) यांना सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावे बोगस अँप विकसित करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
जितेंद्र शाह यांनी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘व्हाट्स अॅपवर सर्फिंग करत असताना त्यांना मागील एक महिन्यांपूर्वी सायबर चाेरट्यांनी व्हाट्स अॅपच्या ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी नियमित शेअर ट्रेडिंगसाठी असलेल्या अधिकृत ट्रेडिंग अॅपचे लाईव्ह कंटेन्ट असलेले परंतु, बनावट पद्धतीचे अॅप खरे असल्याचे भासवून पैसे इन्व्हेस्ट करण्यास प्रवृत्त केले. त्याचवेळी संशयितांनी त्यांना नवीन स्किम सांगत साडेतीन काेटी रुपये गुंतविल्यास थेट साडेसात काेटी रुपये खात्यात जमा हाेतील, असा विश्वास दाखविला. पण, साडेसात काेटी रुपये ‘विथड्राॅल’ करताना अडचण आली. त्यामुळे त्यांच्या मुलाने या ट्रेडिंग अॅपची माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शाह यांना ग्रुपमध्ये अॅड केल्यावर त्यातील इतर संशयित सदस्यांनी ‘आम्हीही असेच पैसे गुंतविले, त्याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला’, हे खात्रीशीर आहे, बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज इतर संशयितांनी टाकले. यातून शाह यांचा विश्वास बसला आणि ते फसले. १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार घडला.
हेही वाचा
धुळ्यात रंगणार पाच दिवसीय ‘महासंस्कृती महोत्सव’, काय काय असणार?
Lok Sabha Election 2024 | लोकसभेत ‘मोदीं’ना हरवणे विरोधकांना का जमले नाही?
वेगवेगळी कामे करणारे ‘एआय’युक्त रोबो
Latest Marathi News जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.
