चंद्रपूर हादरले: लोणी येथे मुलाकडून कुऱ्हाडीने घाव घालून जन्मदात्रीचा खून; वडिलांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आई वडिलांना खोलीत बंद करून मुलाने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील मृत्यूशी झूंज देत आहे. ही घटना आज (दि.२१) दुपारी बाराच्या सुमारास कोरपना तालुक्यातील लोनी गावात घडली. कमला पांडुरंग सातपुते असे मृत वयोवृद्ध जन्मदात्रीचे तर पांडुरंग सातपुते असे जखमी वडिलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील लोणी येथील पांडुरंग सातपुते हे निवासी होते. आज दुपारच्या सुमरास ते घरी असताना पोटच्या पोराने घरात एका खोलीत कोंडून घेतले. आणि त्यांना जिवानिशी ठार करण्याचे उद्देशाने आई वडिलावर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये आई ही जागीच मृत्यूमुखी पडली. तर वडिलाचे डोक्यावर वर झाल्याने ते गंभीर जखमी झाले. वडिलाची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती कोरपना पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृत्तदेह ताब्यात घेवून मृत्युशी झुंज देत असलेल्या वडिलांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. या प्रकरणी आरोपी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते (वय ४५) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास कोरपनाचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस तपासात हत्येचे कारण समोर येणार आहे.
हेही वाचा
चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक
चंद्रपूर : चिमूरात नगर परिषदेच्या विरोधात ‘गनिमी कावा’ आंदोलन
चंद्रपूर: वघाळपेठ येथे विहिरीत पडून अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू
Latest Marathi News चंद्रपूर हादरले: लोणी येथे मुलाकडून कुऱ्हाडीने घाव घालून जन्मदात्रीचा खून; वडिलांची प्रकृती चिंताजनक Brought to You By : Bharat Live News Media.
