परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती

आनंद ढोणे
पूर्णा: शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पूर्णा नदीवरील रहाटी बंधा-यातून सोडलेल्या पाण्याला नादूरुस्त व फुटक्या बंधा-यामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे परभणी येथील मृद व जलसंधारण खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत आहे. Parbhani
येथील बंधा-याच्या बकाल अवस्थेची बातमी ‘दै Bharat Live News Media’ च्या दि. ९ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. त्याची दखल घेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, तालुका प्रभारी सुभाषराव देसाई व माजी पं. स. सदस्य छगनराव मोरे यांच्यासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार गुट्टे यांची भेट घेऊन पूर्णेच्या बंधा-यात रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. Parbhani
आमदार डॉ. गुट्टे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नगरपरिषदेचे प्रशासक यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्यात आले. मात्र या बंधा-यातील फुटक्या लोखंडी प्लेट आणि कुचकामी वायसर प्लेटच्या सांध्यातून लाखो लिटर पाण्याची गळती होऊ लागली आहे. त्यामुळे बंधा-यात साठलेले पाणी लवकरच संपुष्टात येऊन पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाणी गळती थांबविण्याची मागणी मनसे पदाधिका-यांनी प्रशासनाकडे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा
परभणी: ट्रेलरची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी
परभणी: संभाजीनगर-हैदराबाद एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री थरार; प्रवाशांनी चोरट्यांना दिला बेदम चोप
परभणी: गंगाखेड येथे विनयभंगप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
Latest Marathi News परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती Brought to You By : Bharat Live News Media.
