आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढले : काँग्रेसचा गंभीर आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाकडे ११५ कोटी रुपयांचा कर थकीत होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले होते. त्यानंतर ते खाते वापरण्यास काँग्रेस पक्षाला सशर्त परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, आयकर अपील न्यायाधीकरणात कर परतावा प्रकरण प्रलंबित असताना … The post आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढले : काँग्रेसचा गंभीर आरोप appeared first on पुढारी.

आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढले : काँग्रेसचा गंभीर आरोप

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाकडे ११५ कोटी रुपयांचा कर थकीत होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले होते. त्यानंतर ते खाते वापरण्यास काँग्रेस पक्षाला सशर्त परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, आयकर अपील न्यायाधीकरणात कर परतावा प्रकरण प्रलंबित असताना लोकशाहीविरोधी पद्धतीने खात्यातून पैसे काढल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच काँग्रेसने या प्रकरणाची तक्रार केली आहे. हे प्रकरण निकाली निघेपर्यंत कोणतीही कारवाई बँक खात्यांवर केली जाऊ नये, अशी देखील मागणी काँग्रेसने केली आहे.

या संदर्भात बोलताना पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र तपास यंत्रणांच्या कारवाया चुकीच्या पद्धतीने झाल्या तर लोकशाही संपुष्टात येईल. दरम्यान, १६ फेब्रुवारीला काँग्रेसने आयकर विभागावर पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता. पुढे काही तासानंतर, आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने काँग्रेसची खाती सशर्त वापरण्यास परवानगी दिली होती. काँग्रेसने यावर याचिका दाखल केली असुन २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

१६ फेब्रुवारीला अजय माकन म्हणाले होते की, १४ फेब्रुवारीला माहिती मिळाली की, पक्षाने दिलेले चेक बँकांनी थांबवले आहेत. बँका आमचे देयके प्रदान करत नाहीत. तसेच काँग्रेस पक्षाचे खातेही गोठवण्यात आले आहेत. याशिवाय देणगी अभियानाची खातीही गोठवण्यात आली आहेत. पक्षाकडे सध्या वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. खाते गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्राच नाही, तर पक्षांतर्गत सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे एकप्रकारे लोकशाही गोठवण्यासारखे आहे. पुढे बोलताना अजय माकन म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पक्षाची खाती गोठवली जात आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. भाजपने आपल्या खात्यात असंवैधानिकपणे जमा केलेला पैसाही गोठवण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
Latest Marathi News आयकर विभागाने बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढले : काँग्रेसचा गंभीर आरोप Brought to You By : Bharat Live News Media.