धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू

इगतपुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावरील इगतपुरी हद्दीतील टिटोली यार्डजवळ धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. इगतपुरी रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर असलेल्या टिटोली यार्डजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळून आला.
या प्रवाशाच्या अंगात सफेद लाल निळ्या रंगाचा शर्ट, राखाडी पँट, उजव्या गालावर तीळ, शरीराने मध्यम, रंगाने काळा सावळा, चेहरा लांबट, वाढलेली काळी मिशी असे वर्णन आहे. साधारण ३० ते ३५ वय असलेल्या या व्यक्तीबाबत लोहमार्ग पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांनी केले.
हेही वाचा :
Yashasvi vs Virat : अवघ्या 8 व्या कसोटीत जैस्वाल मोडणार कोहलीचा ‘हा’ विक्रम!
महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटातील ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?
NZ vs AUS T20 : टीम डेव्हिडने किवींच्या जबड्यातून विजय हिसकावला, कांगारूंनी पहिली टी-20 जिंकली
Latest Marathi News धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
