चंद्राजवळ पोहोचले खासगी मून लँडर ‘ओडिसियस’

वॉशिंग्टन : चांद्रभूमीवर आतापर्यंत पाच देशांच्या मूनलँडरनी यशस्वीपणे लँड केलेले आहे. आता अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे यानही चंद्राजवळ पोहोचले आहे. ‘इंटुएटिव्ह मशिन्स’ नावाच्या या कंपनीच्या मून लँडरचे नाव आहे ‘ओडिसियस’. एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या रॉकेटच्या सहाय्याने हे मूनलँडर पाठवण्यात आले असून आता ते चंद्राजवळ जाऊन पोहोचले आहे. या कंपनीने ‘नासा’बरोबर 118 दशलक्ष डॉलर्सचा … The post चंद्राजवळ पोहोचले खासगी मून लँडर ‘ओडिसियस’ appeared first on पुढारी.

चंद्राजवळ पोहोचले खासगी मून लँडर ‘ओडिसियस’

वॉशिंग्टन : चांद्रभूमीवर आतापर्यंत पाच देशांच्या मूनलँडरनी यशस्वीपणे लँड केलेले आहे. आता अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे यानही चंद्राजवळ पोहोचले आहे. ‘इंटुएटिव्ह मशिन्स’ नावाच्या या कंपनीच्या मून लँडरचे नाव आहे ‘ओडिसियस’. एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या रॉकेटच्या सहाय्याने हे मूनलँडर पाठवण्यात आले असून आता ते चंद्राजवळ जाऊन पोहोचले आहे.
या कंपनीने ‘नासा’बरोबर 118 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. चंद्रावर लँड करणारे पहिले खासगी मूनलँडर यानिमित्ताने पाहायला मिळू शकते. यापूर्वी खासगी कंपन्यांचे असे प्रयत्न अपयशी ठरले होते. अमेरिकन खासगी कंपनी ‘अ‍ॅस्ट्रोबोटिक’चे मूनलँडर चंद्रावर उतरवण्याची मोहीम याचवर्षी अपयशी ठरली होती. ‘इंटूएटिव्ह मशिन्स’ने स्पेसएक्सच्या ‘फाल्कन 9’ रॉकेटच्या सहाय्याने आपले मूनलँडर पाठवले आहे. गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
ही मोहीम ‘नासा’च्या वाणिज्यिक चंद्र पेलोड सेवेच्या अंतर्गत आहे. त्यापैकी ही दुसरी मोहीम असून अशा मोहिमांमध्ये सरकारी आणि वाणिज्यिक अशा दोन्ही उद्देशांसाठी चंद्रावर नियमितपणे कार्गो डिलिव्हरीची सुविधा दिली जाते. ओडिसियस लँडर लाँच करण्यासाठी एलन मस्क यांच्या स्पेस एक्सने ‘फाल्कन-9’ रॉकेटचा वापर केला. 22 फेब्रुवारीला हे मूनलँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचेल अशी अपेक्षा आहे. याच ठिकाणी भारताच्या ‘चांद्रयान-3’ चे विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर उतरले होते. आता दक्षिण ध्रुवावरील एका विवराजवळ या ‘ओडिसियस’ लँडरला उतरवले जाणार आहे.
Latest Marathi News चंद्राजवळ पोहोचले खासगी मून लँडर ‘ओडिसियस’ Brought to You By : Bharat Live News Media.