गोव्यात पार पडला रकुल प्रीत सिंह-जॅकी भगनानीचा लग्नसोहळा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे लव्हबर्ड रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी आज बुधवारी दि. २१ रोजी विवाहबद्ध झाले. आनंद कारजच्या प्रथेप्रमाणे (शीख विवाह सोहळा) दोघांनीही गोव्यात लग्न केले. एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर रकुल आणि जॅकीचा प्री-वेडिंग सोहळाही गोव्यात पार पडला. त्यासाठी दोघेही तीन दिवस आधीच गोव्यात पोहोचले होते.
संबंधित बातम्या –
महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटातील ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?
Swanandi Berde : लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे मराठी चित्रपटात!
Dadasaheb Phalke International Film Festival Awards : अनिल कपूरला ‘ॲनिमल’साठी तर सान्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
या लग्नसोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या दोघांचे लग्न शीख रितीरिवाजानुसार पार पडले. पण लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या झलकची वाट फॅन्स पाहत आहेत. एखा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे विधी पूर्ण झाले आहेत. या लग्नाला चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
यावेळी शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे आणि ईशा देओल यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपे हिंदू रितीरिवाजानुसार लग्नही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही संध्याकाळी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. या जोडप्याचे लग्नाआधीचे कार्यक्रम १९ फेब्रुवारीपासून सुरू झाले.
गोव्याला लग्नासाठी जाण्यापूर्वी रकुल आणि जॅकीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
Rakul Preet Singh, Jackky Bhagnani tie the knot in intimate Sikh wedding ceremony
Read @ANI Story | https://t.co/Mpx50VGJtN#RakulPreetSingh #JackkyBhagnani #Goa #Wedding pic.twitter.com/Uc3E7tXbDX
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2024
video-viral bhayani insta वरून साभार
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
Latest Marathi News गोव्यात पार पडला रकुल प्रीत सिंह-जॅकी भगनानीचा लग्नसोहळा Brought to You By : Bharat Live News Media.
