गौरी इंगवले-श्रेयस तळपदेचे ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?  

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले आहे. गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण … The post गौरी इंगवले-श्रेयस तळपदेचे ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?   appeared first on पुढारी.
गौरी इंगवले-श्रेयस तळपदेचे ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?  

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले आहे. गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे.
संबंधित बातम्या –

Swanandi Berde : लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे मराठी चित्रपटात!
Tripti Dimri : कियारा नव्हे तर तृप्ती दिसणार ‘भूल भुलैया ३’ मध्ये, कार्तिक आर्यनसोबत रोमान्स
‘जिव्हारी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मराठी ओटीटीवर

या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, “अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्याला संगीतही त्याच ताकदीचे लाभले आहे. या गाण्यात अनेक भावना दडल्या आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिच्या हावभावातून अनेक गोष्टी व्यक्त होतात. या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे चित्रपटाचा आत्मा असतो, त्यामुळे चित्रपटाच्या कथेइतकेच महत्व गाण्यांनाही आहे आणि ही जबाबदारी वैभव जोशी आणि हितेश मोडक यांनी लीलया पार पाडली आहे. संगीतप्रेमींना ही गाणेही आवडेल, यात शंका नाही.”
Latest Marathi News गौरी इंगवले-श्रेयस तळपदेचे ‘सखी माझे देहभान’ गाणे पाहिले का?   Brought to You By : Bharat Live News Media.