निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पदच आहे. निवडणूक देशाची आहे. एखाद्या समूहाच्या मागणीने निवडणुका थांबवता येत नाहीत. आंदोलनात गावात आलेल्या गाड्या जप्त करा, नेत्यांना गावबंदी करा, वृद्धांना आंदोलनात उतरवा असे म्हणणे योग्य नाही.अशा आंदोलनामुळे समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर कोण जबाबदार राहणार? असा सवाल ओबीसी नेते डॉ. बबनराव … The post निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे appeared first on पुढारी.

निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पदच आहे. निवडणूक देशाची आहे. एखाद्या समूहाच्या मागणीने निवडणुका थांबवता येत नाहीत. आंदोलनात गावात आलेल्या गाड्या जप्त करा, नेत्यांना गावबंदी करा, वृद्धांना आंदोलनात उतरवा असे म्हणणे योग्य नाही.अशा आंदोलनामुळे समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर कोण जबाबदार राहणार? असा सवाल ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. आज (दि.२१) ते माध्यमांशी बोलत होते. Babanrao Taiwade
राज्य सरकारचे ओबीसी समाजाकडून आभार मानतो. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, या शब्दांवर सरकार कायम राहिले. प्रशासनाला प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. मनोज जरांगे मोठे आंदोलन उभारणार, असा इशारा देत आहेत. मात्र, सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे. आता जरांगे आणि भुजबळ यांच्या एकमेकांच्या वक्तव्याची सवय झाली आहे. दोघेही एकमेकांवर आक्रमकपणे टीका करतात, असे ते म्हणाले. Babanrao Taiwade
हेही वाचा 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेऊन दाखवा: रविकांत तुपकर
Maratha reservation : जरांगे-पाटील यांनी आंदोलनासंदर्भात केले ‘हे’ आवाहन
Maratha reservation update : जरांगेची राज्यव्यापी रास्ता रोकोची हाक; २४ फेब्रुवारीपासून आंदोलन

Latest Marathi News निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे Brought to You By : Bharat Live News Media.