निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी

सातपूर (नाशिक) : अशोकनगर परिसरातील विश्वास नगर येथील मंदिरात बुधवारी (दि. २१) पहाटे देवाचे मुखवटे, दानपेटी फोडून रोख रक्कमेवर चोरट्याने टल्ला मारल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एकूण एक लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर चोरट्यांना अटक करावी व कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा :
Nashik Crime News : महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल
इम्तियाज जलील यांच्यात धमक असेल तर त्यांनी अमरावतीतून लढावे : नवनीत राणा
गवंड्याला दिले अडीच कोटींचे; कर्जतपासणी अधिकारी व थकीत कर्जदार यांना अटक
Latest Marathi News निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी Brought to You By : Bharat Live News Media.
