रायगड: बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे निधन

विक्रम बाबर
पनवेल: बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे आज (दि.२१) निधन झाले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते, ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके. १९८६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी कायम ठेवली होती.
आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेल्या बैलावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत असली, तरी त्या बैलाला ते विकत घ्यायचे. त्यांच्या बादल बैलाने तब्बल ११ लाखांची शर्यत जिंकली होती.
Latest Marathi News रायगड: बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.
