‘जिव्हारी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मराठी ओटीटीवर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे.
संबंधित बातम्या –
Raja Shivaji : रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट ‘राजा शिवाजी’ मोठ्या पडद्यावर येणार
Dadasaheb Phalke International Film Festival Awards : अनिल कपूरला ‘ॲनिमल’साठी तर सान्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
Sunny Leone : सनी लिओनी प्रभुदेवासोबत “पेट्टा रॅप” डान्स नंबरमध्ये!
परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा परदेशाची वाट न धरता इथेच आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्याचा निर्णय घेतो. जवळजवळ चौदा नोकऱ्या बदलून आई-वडिलांवर भार झालेला हा तरुण आयुष्यात पुढे अशी एक गोष्ट करतो, जे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ती आश्चर्याची गोष्ट काय असेल हे प्रमुख कलावंत निकिता सुरेश कांबळे, सुयोग सुदर्शन भोरे, ओंकारसिंग उदयसिंग राजपूत, नील राजुरीकर, मनीषा दामोदर मोरे या नवोदित कलाकारांच्या टवटवीत अभिनयाने ‘जिव्हारी’ची गोष्ट कळणार आहे. चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन गणेश शंकर चव्हाण यांनी केली आहे.
Latest Marathi News ‘जिव्हारी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मराठी ओटीटीवर Brought to You By : Bharat Live News Media.