पैठण येथे लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील लक्ष्मी नगर येथे तरूणाचा लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक माहिती अशी की, कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. … The post पैठण येथे लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून appeared first on पुढारी.

पैठण येथे लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण शहरातील लक्ष्मी नगर येथे तरूणाचा लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की, कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मी नगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा पोहोच करायचे. मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला होता. अज्ञाताने त्याच्या तोंडावर लोखंडी फावड्याने प्रहार करून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
हेही वाचा : 

हिंगोलीत भगरीमुळे १०० जणांना विषबाधा
माेठी बातमी : जरांगे पाटील यांची राज्यव्यापी रास्ता रोकोची हाक
‘सगेसोयरे’ अंमलबजावणीसाठी जरांगेंचे सरकारला दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Latest Marathi News पैठण येथे लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून Brought to You By : Bharat Live News Media.