मुलाला संस्कार देऊ शकत नसाल तर…; स्मृती इराणींचा सोनिया गांधींना सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशचे भविष्य रात्री दारू पिऊन नाचत आहे. दारू पिऊन रस्त्यावर तरूण पडलेले पाहिले, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान केले. यावरून आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला योग्य संस्कार … The post मुलाला संस्कार देऊ शकत नसाल तर…; स्मृती इराणींचा सोनिया गांधींना सल्ला appeared first on पुढारी.

मुलाला संस्कार देऊ शकत नसाल तर…; स्मृती इराणींचा सोनिया गांधींना सल्ला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशचे भविष्य रात्री दारू पिऊन नाचत आहे. दारू पिऊन रस्त्यावर तरूण पडलेले पाहिले, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान केले. यावरून आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला योग्य संस्कार देऊ शकत नसाल, तर त्याला बोलण्यापासून रोखा, असा खोचक सल्ला त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्य़क्षा सोनिया गांधींना दिला आहे. Smriti Irani On Sonia Gandhi
स्मृती इराणी म्हणाल्या की, राहुल गांधींच्या मनात उत्तर प्रदेशबद्दल किती विष आहे. हे त्यांच्या असभ्य टिप्पणीवरून स्पष्ट होते. वायनाडला गेल्यावरही राहुल गांधींनी यूपीच्या जनतेवर अशोभनीय टीका केली होती. त्यांनी रामलल्लाच्या अभिषेकाचे निमंत्रण नाकारले होते आणि आज ते काशीतील तरुणांवर अशोभनीय टिप्पणी करत आहेत. काँग्रेसचे भवितव्य अंधारात आहे, पण उत्तर प्रदेशचे भवितव्य प्रगतीकडे आहे. सोनिया गांधींना माझी सूचना आहे की, जर तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकत नसाल, तर त्यांनी आमच्या पवित्र स्थानांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यापासून राहुल यांना रोखावे. Smriti Irani On Sonia Gandhi
राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह अमेठी आणि रायबरेली येथे पोहोचले आहेत, तर स्मृती इराणीही त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आहेत. दरम्यान, राहुल गांधींचे एक विधान समोर आले आहे, ज्यात त्यांनी वाराणसीतील तरुणांना दारू पिऊन रस्त्यावर पडलेल्या आणि रात्री नाचणाऱ्यांबद्दल बोलले आहे. या वक्तव्यावर इराणी यांनी यूपीतील तरुण आणि पवित्र स्थळांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी म्हणाले होते, ‘मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा पाहिले की, रात्री बासरी वाजवली जात होती आणि यूपीचे भविष्य तिथे दारूच्या नशेत रस्त्यावर पडले होते. तिकडे यूपीचे भविष्य दारूच्या नशेत नाचत आहे. तर दुसरीकडे राम मंदिरात तुम्हाला नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी दिसणार आहेत. भारताचे अब्जाधीश दिसतील, पण मागासवर्गीय, दलित, आदिवासी दिसणार नाहीत. ती तुमची जागा नाही. तुमची जागा रस्त्यावर भीक मागायची आणि पोस्टर दाखवायची, असे ते म्हणाले होते.

#WATCH | Amethi: Congress leader Rahul Gandhi says, “I went to Varanasi and I saw that instruments are being played at night. I saw people lying on the road after drinking alcohol. The future of Uttar Pradesh is dancing after drinking alcohol at night. On the other side, there is… pic.twitter.com/0s3a5HZ5LG
— ANI (@ANI) February 20, 2024

हेही वाचा 

Rahul Gandhi : राहुल गांधींना अर्ध्या तासाची कोठडी आणि लगेच जामीन मंजूर
BJP criticizes Rahul Gandhi : राहुल गांधी करतात भारत जोडो यात्रा, पण त्यांच्या खासदारांची देश विभागण्याची भाषा : भाजपची टीका
मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप घाबरले : नाना पटोले

Latest Marathi News मुलाला संस्कार देऊ शकत नसाल तर…; स्मृती इराणींचा सोनिया गांधींना सल्ला Brought to You By : Bharat Live News Media.