Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे. तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, रहस्यमय आणि रंजक असा हा टीझर आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल कुतुहुल निर्माण झाले आहे. टीझरच्या सुरुवातीलाच आश्विनी कुलकर्णी आणि संजय खापरे हे पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत.
संबंधित बातम्या –
Sunny Leone : सनी लिओनी प्रभुदेवासोबत “पेट्टा रॅप” डान्स नंबरमध्ये!
MyLek : आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ यादिवशी भेटीला
LagnaKallol Movie Trailer : कल्लोळ घालायला येतोय ‘लग्न कल्लोळ’, धमाकेदार ट्रेलर पाहाच (Video)
टीझरमधून हा चित्रपट सीरियल किलर या विषयावर असल्याचा अंदाज येत आहे. तसेच चित्रपटात आई मुलाचे प्रेम देखील दिसून येत आहे. चित्रपटाचा लुक देखील फ्रेश दिसत आहे मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडलं आहे ? हे चित्रपट प्रत्यक्षात पहिल्यानंतर समजेल.
गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी सोबत अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंटचे फैरोज माजगावकर, हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आहेत. सहनिर्माते अनिल वहाने आणि सुनील यादव आहेत. रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद अजित दिलीप पाटील यांनी लिहिलीय. पटकथा रोहित नरसिंगे यांची आहे. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट आहे. अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष, एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहेत.
Latest Marathi News ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’मध्ये झळकणार रत्नागिरीचा फैरोज माजगावकर-अश्विनी कुलकर्णी Brought to You By : Bharat Live News Media.