व्यापाऱ्यांना तारा, शेतकऱ्यांना मारा, हाच सरकारचा नारा
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा
कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यातबंदी उठवलीच नाही. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा, असा या सरकारचा नारा आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केला.
जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये लिहिले आहे की, ‘राज्यात चालू रब्बी हंगामात ४ लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे अजून नुकसान होऊ शकते.’
हेही वाचा :
शेतकरी आंदोलक शंभू-खनौरी सीमेवर एकवटले
राज्यातील जलसाठा ५० टक्क्यांच्याही खाली, भीषण पाणीटंचाईची शक्यता
कृषी : पुन्हा बळीराजाचा एल्गार
Latest Marathi News व्यापाऱ्यांना तारा, शेतकऱ्यांना मारा, हाच सरकारचा नारा Brought to You By : Bharat Live News Media.