Accident : उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळला; जीवितहानी टळली

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) येथील मुख्य चौकात उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळून अपघात झाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चारचाकी गाडीतील पाच जणांचे प्राण वाचले. सोमवारी (दि. 19) रात्री 7 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 16 सीवाय 7812) हा सोमेश्वर कारखान्याकडे चालला होता. त्याच वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. … The post Accident : उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळला; जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Accident : उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळला; जीवितहानी टळली

सोमेश्वरनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) येथील मुख्य चौकात उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळून अपघात झाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चारचाकी गाडीतील पाच जणांचे प्राण वाचले. सोमवारी (दि. 19) रात्री 7 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 16 सीवाय 7812) हा सोमेश्वर कारखान्याकडे चालला होता. त्याच वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. जगताप यांचे जावई जितेंद्र मोहिते, मुलगी पायल मोहिते, नात राजलक्ष्मी, जिजाई (सर्व रा. नांदेड सिटी, पुणे) व पत्नी शोभा प्रकाश जगताप (रा. मुरुम, ता. बारामती) हे देवदर्शनावरून बलेनो वाहना (एमएच 12 क्यूटी 8093) मधून मुरुमकडे जात होते.
या वेळी सिनेमा चौकात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली चालू गाडीवर कोसळली. प्रसंगावधान ओळखून नागरिकांनी तत्काळ गाडीतील सर्वांना बाहेर काढल्याने अनर्थ टळला; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व कर्मचार्‍यांनी भेट दिली. पोलिसांनी अन्य वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने तसेच करंजेपूल आणि वाणेवाडी येथील निरा डाववा कालव्यवरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून अपघाताच्या घटना सतत घडत आहेत.
हेही वाचा

बांधकाम, पाणीपुरवठा व महावितरण जोडले जाणार
चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक
जागतिक मातृभाषा दिन : तंत्रज्ञानाने विदेशी भाषा शिक्षण मातृभाषेत उपलब्ध

Latest Marathi News Accident : उसाने भरलेला ट्रॅक्टर मोटारीवर कोसळला; जीवितहानी टळली Brought to You By : Bharat Live News Media.