शेतकरी आंदोलक शंभू-खनौरी सीमेवर एकवटले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : किमान हमी भाव व अन्य मागण्यांसाठी शेतकरी पंजाब-दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारशी चर्चा सुरू असतानाच आज (दि.२१) शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चाची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते आणि सदस्यांनी सकाळपासून शंभू आणि खनौरी सीमेवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी हायड्रोलिक क्रेन, जेसीबी, पोकलेन अशी अवजड यंत्रसामग्री शंभू सीमेवर आणण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. ( Farmer’s protest : Delhi march resumes today; security beefed up on borders )
शेतकरी शंभू सीमेवर जमू लागले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीकडे कूच करण्याचे जाहीर केले आहे. शेतकरी नेते काका सिंह कोटरा यांनी सांगितले की, “आमच्या सर्व संघटनांची बैठक झाली. कोणत्या ठिकाणाहून कोण जाणार याचे नियोजन झाली आहे. सरकारने मागणी मान्य न केल्यास आम्ही दिल्लीकडे जाण्यासाठी मोर्चा काढू.” दरम्यान, पंजाब-दिल्ली सीमेवर पंजाब पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
मोर्चात नेतेच असणार आघाडीवर : शेतकरी नेते पंढेर
आंदोलकांच्या दिल्ली चलो आंदोलनादरम्यान शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, मोर्चात कोणताही शेतकरी किंवा तरुण आंदोलनात पुढे जाणार नाही. नेते आघाडीवर असतील. आम्ही शांततेने जाऊ. केंद्र सरकारने एमएसपीवर कायदा केल्यास हे सर्व संपुष्टात येऊ शकते.
सरकारने बॅरिकेड हटवावीत : शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही 7 नोव्हेंबरपासून दिल्लीला पोहोचण्याची योजना आखली आहे. आता सरकारला पुरेसा वेळ मिळाला नाही, असे सरकार म्हणत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की. ते आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला रोखण्यासाठी मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सरकारने ती बॅरिकेड हटवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
#WATCH | On the ‘Delhi Chalo’ march today, farmer leader Sarwan Singh Pandher says, “We’ve decided that no farmer, youth will march forward. Leaders will march ahead. We will go peacefully… All this can be ended if they (central govt) make a law on MSP…” pic.twitter.com/PFmVaKkY60
— ANI (@ANI) February 21, 2024
The post शेतकरी आंदोलक शंभू-खनौरी सीमेवर एकवटले appeared first on Bharat Live News Media.
