रेडिओचा आवाज हरपला! अमीन सयानी यांचे हार्टॲटॅकने निधन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रेडिओचा आवाज अशी ओळख असलेले अमीन सयानी (Radio Host Ameen Sayani) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. (Radio Host Ameen Sayani) रेडीओ/विविध भारतीचे लोकप्रिय अनाउन्सर आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचे निधन झाले. मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी एखा वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.
अमीन सयानी यांना मंगळवारी त्य़ांच्या दक्षिण मुंबई येथील घरी सायंकाळी ६ वाजता हार्ट ॲटॅक आला. त्यानंतर त्यांना तत्काळ एच. एन. रिलायन्स फौंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांवा डॉक्टरांनी मृत घोषित केले.
One of the greatest radio presenters, Ameen Sayani has passed away.
He was the iconic presenter of the popular radio show “Binaca Geet Mala”.#RIP #AmeenSayani @MIB_India @prasarbharati @airnewsalerts pic.twitter.com/S0aO4L5a1M
— Akashvani आकाशवाणी (@AkashvaniAIR) February 21, 2024
Latest Marathi News रेडिओचा आवाज हरपला! अमीन सयानी यांचे हार्टॲटॅकने निधन Brought to You By : Bharat Live News Media.