शिरूरची राजकीय समीकरणे बदलणार का?

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांच्या मंचर येथील सभेनंतर शिरूर लोकसभेची व येथील विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे नेते शरद पवार आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेणार असल्याची चर्चा होती. पहिली सभा पवारांचे अत्यंत विश्वासू व … The post शिरूरची राजकीय समीकरणे बदलणार का? appeared first on पुढारी.

शिरूरची राजकीय समीकरणे बदलणार का?

शिवनेरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शरद पवारांच्या मंचर येथील सभेनंतर शिरूर लोकसभेची व येथील विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे नेते शरद पवार आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेणार असल्याची चर्चा होती. पहिली सभा पवारांचे अत्यंत विश्वासू व मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार होते.
परंतु, पवारांनी पहिली जाहीर सभा मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघात येवले येथे घेतली. त्यानंतर शरद पवार तीन-चारवेळा शिरूर लोकसभेतील जुन्नर तालुक्यात दोनवेळा, मंचर येथे धावती भेट आणि खेड तालुक्यात एकदा जाहीर कार्यक्रमांना उपस्थित होते. परंतु, या सर्व ठिकाणी एकदाही पवार स्थानिक राजकारण अथवा आपल्याला सोडून गेलेल्या मंत्री, आमदारांविषयी बोलले नाहीत. आंबेगाव तालुक्यातील दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक व विधानसभा निवडणुकीसाठी पवार गटात सहभागी झालेले देवदत्त निकम यांनी पवारांच्या सभेचे आयोजन केले आहे.
यामध्ये ’मी येतोय.. तुम्ही या’ अशी भावनिक साद घालत सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही सभा होत असली तरी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सभेच्या बॅनरमधून फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, तर दुसरीकडे सभेसाठी उपस्थित राहणार्‍या पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचे ’वादा तोच; पण दादा नवीन’ टॅगलाइन घेऊन अजित पवार यांनाही खुले आव्हान देण्यात आले आहे.
हेही वाचा

बांधकाम, पाणीपुरवठा व महावितरण जोडले जाणार
चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक
हाजी मस्तान मिर्झा! कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन?

Latest Marathi News शिरूरची राजकीय समीकरणे बदलणार का? Brought to You By : Bharat Live News Media.