चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा  राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. समारू देवारसिंग निषाद  (वय ४०) रा. कामगार नगर रामपुर, ता. राजुरा, जि. चंद्रपुर (मुळ गाव बिहरी खुर्द, ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव) आणि बलराम दुर्जन निषाद (वय २७) रा. महेश नगर, … The post चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक appeared first on पुढारी.

चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा 
राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. समारू देवारसिंग निषाद  (वय ४०) रा. कामगार नगर रामपुर, ता. राजुरा, जि. चंद्रपुर (मुळ गाव बिहरी खुर्द, ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव) आणि बलराम दुर्जन निषाद (वय २७) रा. महेश नगर, ता. जि. चंद्रपुर (मुळ गाव बिहरी खुर्द, ता. अंबागढ  जिल्हा राजनांदगाव) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. ही कारवाई राजुरा पोलिसांनी केली.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी रमेश बापुराव बरडे रा. साखरावाही हे  १३ फेब्रुवारी रोजी सकाळी घराला कुलुप लावुन शेतामध्ये काम करण्यास गेले होते. शेतामध्ये दिवसभर काम करून सायंकाळी परत आले असता अज्ञात व्यक्तीने दरवाज्याचा कुलूप तोडुन आलमारीचे लॉकरमध्ये ठेवलेले ६ नग सोन्याचे जिवत्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाचे सुमारे ११ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता. १५ फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती वरुन रामपुर येथे समारू निषाद आणि बलराम निषाद हे रामपुर हददीतील शिवमंदीरच्या मागे संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी रामपूर, खामोना, माथरा, पांढरपौनी, पवनी, चनाखा, टेंबूरवाही, सोडा येथे तब्बल १० ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोटासायकल, रोख रक्कम आणि चोरीच्या घटनेकरिता वापरलेले हत्यार, असा एकूण ६३,९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा : 

यवतमाळ : पदयात्रेतील ४० भाविकांना जेवणातून विषबाधा
यवतमाळ : वणी येथे विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात
पुलाचे बांधकामाकरीता आम आदमी पार्टी तर्फे रास्तारोको; अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद

Latest Marathi News चंद्रपूर : दहा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.