16 टक्के नवीन मधुमेहींमध्ये रेटिनोपॅथी; 150 रुग्णालयांत 3000 रुग्णांची तपासणी

पुणे : भारतीयांंमध्ये अनेकदा उशिरा मधुमेहाचे निदान होते. मात्र, दरम्यानच्या काळात मधुमेहाचा डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन रेटिनोपॅथीचा आजार विकसित होतो. राज्य नेत्ररोग संघटनेने राज्यातील 150 रुग्णालयांत सुमारे 3000 रुग्णांची तपासणी केली असता 16 टक्के रुग्णांना रेटिनोपॅथी झाल्याचे आढळून आले. मधुमेहाचे निदान झाल्यावर इतर आजारही उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच तपासणी, निदान आणि उपचार न केल्यास आजाराचा … The post 16 टक्के नवीन मधुमेहींमध्ये रेटिनोपॅथी; 150 रुग्णालयांत 3000 रुग्णांची तपासणी appeared first on पुढारी.

16 टक्के नवीन मधुमेहींमध्ये रेटिनोपॅथी; 150 रुग्णालयांत 3000 रुग्णांची तपासणी

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतीयांंमध्ये अनेकदा उशिरा मधुमेहाचे निदान होते. मात्र, दरम्यानच्या काळात मधुमेहाचा डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन रेटिनोपॅथीचा आजार विकसित होतो. राज्य नेत्ररोग संघटनेने राज्यातील 150 रुग्णालयांत सुमारे 3000 रुग्णांची तपासणी केली असता 16 टक्के रुग्णांना रेटिनोपॅथी झाल्याचे आढळून आले. मधुमेहाचे निदान झाल्यावर इतर आजारही उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच तपासणी, निदान आणि उपचार न केल्यास आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आणि शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. त्यामुळे राज्य नेत्ररोग संघटनेतर्फे कधीही तपासणी केली नव्हती अशा मधुमेही रुग्णांमध्ये रेटिनोपॅथी शोधण्यासाठी सामूहिक तपासणी मोहीम घेण्यात आली.
मधुमेहामुळे रेटिनोपॅथीमध्ये डोळ्यांशी संबंधित गुंतागुंत उद्भवते. त्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. अनियंत्रित मधुमेह राहिल्यास अंधत्व येऊ शकते. सर्वेक्षणानुसार नव्याने मधुमेहाचे निदान झालेले 16.10 टक्के रेटिनोपॅथी रुग्ण प्रथमच आढळून आले. संघटनेच्या 3000 सदस्यांच्या सहकार्याने 157 सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी मोहीम आयोजित केली होती. महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. वर्धमान कांकरिया म्हणाले की, मधुमेह सर्व सामाजिक-आर्थिक वर्गातील लोकांमध्ये बाळावत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही वेळेत निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांची राज्यभरातील रुग्णालयांमध्ये तपासणी केली. रेटिनोपॅथीची स्थिती शोधण्यात आली. मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला. रेटिनोपॅथीचे वेळीच निदान झाल्यास औषधोपचारांनी उपचार करणे शक्य होते. शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.
मधुमेह असणारे बहुतेक लोक डोळ्यांकडे दुर्लक्ष करतात. केवळ साखरेची पातळी नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. मधुमेह रेटिनोपॅथीमुळे दृष्टी धूसर होऊ शकते. अंधत्व देखील येऊ शकते. या स्थितीत डोळ्यांतील पडद्यामधील रक्तवाहिन्या प्रभावित होतात. प्रत्येक मधुमेही व्यक्तीने वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.
– डॉ. संजय पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

अशी पार पडली तपासणी मोहीम
तपासणी केलेल्या मधुमेही रुग्णांपैकी किमान 16 % रुग्णांना पहिल्यांदाच डायबेटिक रेटिनोपॅथी आढळून आला. याबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता नव्हती. यातून 313 नवीन डायबेटिक रेटिनोपॅथी रुग्ण आढळले. खासगी आणि सरकारी दोन्ही हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. या सामूहिक तपासणी कार्यक्रमासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.तंत्रज्ञानाचा वापर पॅरामेडिकल कर्मचारी किंवा अगदी परिचारिका देखील सहजपणे करू शकतात. मशिनच्या आधारे डोळ्यांच्या नमुन्यांमधील विकृती शोधू शकतात. सॉफ्टवेअरमध्ये माहिती जोडली गेली असल्याने इंटरनेटचीही गरज नाही. त्यामुळे राज्याच्या दुर्गम भागातही यशस्वी तपासणी करण्यात आली.
हेही वाचा

Pm-Ebus Sewa Nashik : ई-बस डेपोसाठी नाशिक मनपाची केंद्राकडे धाव
Nashik Water Supply | शुक्रवारी शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
हाजी मस्तान मिर्झा! कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन?

Latest Marathi News 16 टक्के नवीन मधुमेहींमध्ये रेटिनोपॅथी; 150 रुग्णालयांत 3000 रुग्णांची तपासणी Brought to You By : Bharat Live News Media.