बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले

पुढारी ऑनलाईन : झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवल्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अखिलेश यादव हे मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर आता बाबा सिद्दीकी यांचे आमदार … The post बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले appeared first on पुढारी.

बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले

Bharat Live News Media ऑनलाईन : झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवल्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अखिलेश यादव हे मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर आता बाबा सिद्दीकी यांचे आमदार चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. ते वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत.
बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिमचे माजी आमदार आहेत; तर झीशान हे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते. वयाच्या २७ व्या वर्षी ते आमदार झाल्यामुळे ते चर्चेत आले होते. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या गटाचे मानले जातात.

Akhilesh Yadav to be the new President of Mumbai Youth Congress after Zeeshan Siddiqui was removed from the position pic.twitter.com/FPR9Q2HzSL
— ANI (@ANI) February 21, 2024

Latest Marathi News बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले Brought to You By : Bharat Live News Media.