कोणत्या नव्या वळणावर येणार शिवा मालिका?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका ‘शिवा’ लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. प्रेक्षक शिवा आणि आशुतोषच्या जीवनातील होणाऱ्या हालचाली या मालिकेत पाहू शकतील . मंदिरात गुरुजीं आशुतोषचे लवकरच लग्न होणार अशी बातमी देतात, पण देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गा प्रकट होणार हे देखील सांगतात, यावर सगळ्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते.
संबंधित बातम्या –
Kareena Kapoor : दादासाहेब फाळके महोत्सवात करीनाने शाहिद केलं इग्नोर?
Dadasaheb Phalke Film Awards 2024 | शाहरूख खान, नयनतारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
Virat-Anushka Baby : विराट-अनुष्काला मुलगा झाला; दुसऱ्या बाळाच्या स्वागतानंतर दोघांनी केली ‘या’ नावाची घोषणा
दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते. येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. कोणत्या नव्या वळणावर येणार मालिका? ॲक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेली मालिका शिवा’ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० पाहता येईल.
Latest Marathi News कोणत्या नव्या वळणावर येणार शिवा मालिका? Brought to You By : Bharat Live News Media.