आता दिलेलं मराठा आरक्षण कसं टिकणार याबदद्ल शंका : शरद पवार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंदर्भात माझ्या मनात शंका आहे. २०१४ मध्येही मराठ्यांना आरक्षण दिले होते पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता दिलेलं आरक्षण टिकणार नाही. ते कसं टिकणार याबद्दल शंका आहे. असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शऱद पवार यांनी केले. आज (दि.२१) ते कोल्हापुरमधून बोलत होते. (Sharad Pawar)
“मला कोणीही काँग्रेस सोडायला सांगितले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. येथेही प्रामाणिक आणि सकारात्मक काम करणार” असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शऱद पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी आज (दि.२१) संवाद साधत होते. ते म्हणाले, “”अशोक चव्हाण यांच उदाहरण सगळ्यांना आश्चर्यकारक होते. पण, मला तितके आश्चर्यकारक वाटल नाही. भाजपनं एक व्हाईट पेपर काढला होता. त्यात आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. त्यानंतर वाटायला लागलं की ही एकप्रकारे धमकी असण्याची शक्यता आहे. या धमकीचे परिणाम नंतर झाले,” असं खोचक विधान शरद केलं आहे.
बातमी अपडेट होत आहे
कोल्हापूरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, दिल्ली पार्लमेंट मधील आमचे सहकारी… pic.twitter.com/5vM44VfsHX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 20, 2024
हेही वाचा
दीड वर्षापूर्वीच जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पी. आर. पाटील यांचा गौप्यस्फोट
ओबीसी, राजकीय आरक्षणास मागास वर्ग आयोगाचा विरोध; राज्यात मराठा 28 टक्के, 84 टक्के समाज मागास
Latest Marathi News आता दिलेलं मराठा आरक्षण कसं टिकणार याबदद्ल शंका : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.