विमानतळावरील मालवाहतुकीत 20 टक्के वाढ : उत्पन्नाला हातभार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील प्रवाशांमध्ये जशी वाढ होत आहे तशीच वाढ मालवाहतुकीतही दिसून येत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून होणार्‍या मालवाहतुकीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमानतळाच्या उत्पन्नाला मोठा हातभार लागला आहे. पुणे विमानतळावरून दररोज 180 च्या घरात विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात … The post विमानतळावरील मालवाहतुकीत 20 टक्के वाढ : उत्पन्नाला हातभार appeared first on पुढारी.

विमानतळावरील मालवाहतुकीत 20 टक्के वाढ : उत्पन्नाला हातभार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील प्रवाशांमध्ये जशी वाढ होत आहे तशीच वाढ मालवाहतुकीतही दिसून येत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून होणार्‍या मालवाहतुकीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमानतळाच्या उत्पन्नाला मोठा हातभार लागला आहे. पुणे विमानतळावरून दररोज 180 च्या घरात विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात प्रवासी वाहतूक होते.

येथून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील होतात. देशांतर्गत उड्डाणांची संख्या सर्वाधिक असून, फक्त दोनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. विमानांद्वारे मालाची देखील वाहतूक केली जाते. 2022-23 च्या तुलनेत यंदा (2023-24) मालवाहतुकीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाणे देखील वाढणार आहेत. परिणामी, प्रवासीसंख्या आणि मालवाहतुकीत देखील आपोआपच वाढ होणार आहे.

अशी झाली मालवाहतूक

 फळे, फुले, भाज्या – 25 टक्के
अ‍ॅटो पार्ट – 30 टक्के
औषधे – 30 टक्के
अन्य कार्गो – 15 टक्के
एकूण – 33 हजार 355 (100 टक्के)

वर्ष                     मालवाहतूक   (मेट्रिक टनमध्ये)

2020-21         25 हजार 721
2021-22         28 हजार 695
2022-23         33 हजार 286
2023-24         33 हजार 355

(मार्च ते डिसेंबर 2023 पर्यंत)
हेही  वाचा

लिंग गुणोत्तरात 669 ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये
मराठ्यांचा विश्वासघात! आज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार
Sharad Pawar : प्रतिगामी शक्तींविरोधात लढा हीच पानसरे स्मारकाची प्रेरणा : शरद पवार

 
Latest Marathi News विमानतळावरील मालवाहतुकीत 20 टक्के वाढ : उत्पन्नाला हातभार Brought to You By : Bharat Live News Media.