Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस हुडहुडीचे
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पाकिस्तानासह पंजाब राज्यात पश्चिमी चक्रवात अतितीव्र झाल्याने हवेच्या वरच्या थरांत वार्याचा वेग ताशी 260 ते 300 किलोमीटर वेगाने वाढला आहे. त्यामुळे कश्मिरमध्ये हिमवर्षावाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्र देखिल 21 ते 23 फेब्रुवारी या तीन दिवसांत गारठणार असून पारा 10 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसापासून कश्मिरात बर्षवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे सोमवारी त्या भागात रेड अलर्ट देण्यात आला होता. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेशसह पूर्वोत्तर राज्ये गारठण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हवेच्या वरच्या थरांत वार्याचा वाढलेला प्रचंड वेग,अरबी समुद्रात तयार झालेली चक्रीय स्थिती यामुळे तिकडून बाष्पयुक्तवारे महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट तीन दिवस 3 ते 4 अंशांनी घट होईल असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा
Diesel supply : भारतातून युरोपसाठी होणारा डिझेल पुरवठा 90 टक्क्यांनी घटला
Lok Sabha Election : कोल्हापुरातून लोकसभेसाठी शाहू महाराज निश्चित
सांगली : जमीन वाटपाच्या वादातून नातू, सुनेने सासूला संपविले; पारे गावातील घटना
Latest Marathi News Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस हुडहुडीचे Brought to You By : Bharat Live News Media.