यवतमाळ : वणी येथे विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : वणी येथे स्व. खा. बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन येथील जत्रा मैदानात २० फेब्रुवारीपासून करण्यात आले आहे. दुपारी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे १५० ते … The post यवतमाळ : वणी येथे विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात appeared first on पुढारी.

यवतमाळ : वणी येथे विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : वणी येथे स्व. खा. बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन येथील जत्रा मैदानात २० फेब्रुवारीपासून करण्यात आले आहे. दुपारी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे १५० ते २०० बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी तर तर दुसऱ्या गटात तरुण (गोहे) बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी येणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ‘अ’ गटात पहिले बक्षीस एक लाख एक हजार, दुसरे ७१ हजार, तिसरे ५१ हजार यासह १३ रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे. ‘ब’ गटात पहिले बक्षीस ४१ हजार, दुसरे ३१ हजार, तिसरे २१ हजार यासह आणखी १३ बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. गावगाडा स्पर्धेसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

 कार्यक्रमाच्या आयोजनासाठीराजा पाथ्रडकर, जयसिंग गोहोकर, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, शंकर वऱ्हाटे, संजय सपाट, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर, प्रेमानंद धानोरकर, रूपेश ठाकरे, सूर्यकांत खाडे, प्रफुल्ल उपरे, जितेंद्र बोंडे, सतीश खाडे, अमित संते, नितिन खाडे, अनिल भोयर, मनीष खाडे आदींची समिती स्थापन करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.
Latest Marathi News यवतमाळ : वणी येथे विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.