रत्नागिरी: करबुडे, दाभीळ-आंबेरे, वाटद-मिरवणे येथे आंबा बागांना आग

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा: तालुक्यात करबुडे, दाभीळ – आंबेरे, वाटद-मिरवणे या तीन ठिकाणी लागलेल्या आगीत आंबा, काजूसह विविध बागांचे सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाले. या तिन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. भात शेतामध्ये भाजावळ करत असताना वाऱ्यामुळे ही आग पसरल्यामुळे नुकसान झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. नुकसान झालेल्यामध्ये जयगड … The post रत्नागिरी: करबुडे, दाभीळ-आंबेरे, वाटद-मिरवणे येथे आंबा बागांना आग appeared first on पुढारी.

रत्नागिरी: करबुडे, दाभीळ-आंबेरे, वाटद-मिरवणे येथे आंबा बागांना आग

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यात करबुडे, दाभीळ – आंबेरे, वाटद-मिरवणे या तीन ठिकाणी लागलेल्या आगीत आंबा, काजूसह विविध बागांचे सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाले. या तिन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
भात शेतामध्ये भाजावळ करत असताना वाऱ्यामुळे ही आग पसरल्यामुळे नुकसान झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. नुकसान झालेल्यामध्ये जयगड महसूल मंडळातील वाटद -मिरवणे गावात अचानक लागलेल्या वणव्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ७ खातेदारांच्या आंबा बागा जळून खाक झाल्या आहेत. यात सुमारे २००हून अधिक झाडांचा समावेश आहे.
दाभिळ-आंबेरे येथील संजय भालचंद्र पाटकर यांच्या कलम बागेला आग लागुन अंदाजे ३ लाख ७५ हजार इतके नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक लोकांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तर करबुडे येथील बागायतदार सावंत यांच्या आंबा बागेतील १०० ते १२५ झाडे जळून खाक झाली. या बागेतील बहुसंख्य झाडांना कैरी आणि मोहोर होता. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
हेही वाचा 

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच उपलब्ध होणार एमआरआयची सुविधा
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘जमाव बंदी आदेश’ लागू
रत्नागिरी : ‘काजू बी’ ला अवघा १२६ रु. दर!

Latest Marathi News रत्नागिरी: करबुडे, दाभीळ-आंबेरे, वाटद-मिरवणे येथे आंबा बागांना आग Brought to You By : Bharat Live News Media.