सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- टोळी निर्माण करून दहशत पसरविणे तसेच जीवघेणा हल्ला करणे आदी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला नईम मेहबूब शहा (२१, रा. सुंदर नगर, देवळाली) यास साई गणेश लॉज, टिटवाळा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. १६) उपनगर पोलिस ठाणे हद्दीत टोळी प्रमुख राहुल उज्जेनवाल याने त्याच्या साथीदारासह फिर्यादी मयूर विजय राेहम … The post सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- टोळी निर्माण करून दहशत पसरविणे तसेच जीवघेणा हल्ला करणे आदी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला नईम मेहबूब शहा (२१, रा. सुंदर नगर, देवळाली) यास साई गणेश लॉज, टिटवाळा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. १६) उपनगर पोलिस ठाणे हद्दीत टोळी प्रमुख राहुल उज्जेनवाल याने त्याच्या साथीदारासह फिर्यादी मयूर विजय राेहम व त्याच्या साथीदारास धारदार हत्याराने व गावठी कट्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
सदर गुन्ह्यातील संशयित नईम मेहबूब शहा फरार असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुंडा पथकाचे पोलिस हवालदार विजय सूर्यवंशी यांना राहुल हा टिटवाळा, कल्याण येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी तत्काळ पोलिस उपाआयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस ज्ञानेश्वर मोहीते, पोलिस हवालदार विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी टिटवाळा, कल्याण येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता नईम शहा यास टिटवाळ्यातील गणेश लॉज येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, गुंडाविरोधी पथकाच्या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्तांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :

Thane News : आ. गणपत गायकवाडांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड; चौघांना अटक
IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार!
Washim News : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण

Latest Marathi News सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या Brought to You By : Bharat Live News Media.