कोल्हापूरच्या खासदारकीच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका जाहीर; म्हणाले, ‘शाहू महाराज…’
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.
महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. या चर्चेमुळे कोल्हापूरच्या खासदारकीच्या जागेविषयी राजकारणात रंगत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात होती. या भेटीनंतर शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांवर बोलत असताना शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची शाहू महाराजांच्या बद्दल उमेदवारीबाबतची पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली आहे. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल असे पवार यावेळी म्हणाले.
महायुती जागावाटप
महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. महायुतीच्या जागावाटपाबाबत मला काही कल्पना नाही असही पवार यावेळी म्हणाले.
भाजपवर टीका
भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत अशी खोचक टीका भाजपवर केली.
Latest Marathi News कोल्हापूरच्या खासदारकीच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका जाहीर; म्हणाले, ‘शाहू महाराज…’ Brought to You By : Bharat Live News Media.