सोलापूर : धावत्या ट्रकमधून किमती मालाची चोरी; आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : महामार्गावर चालत्या मालट्रकमधील किमती मालाची धाडसी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी आज (दि.२०) अटक केली. ही चोरी ८ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास वरवडे (ता.माढा) हद्दीत झाली होती. टेंभुर्णी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे मुद्देमालासह चौघांना जेरबंद केले. याप्रकरणी जिंदावली भोंगळे (वय ३२, रा.आझाद चौक लोहारा, जि.उस्मानाबाद) यांनी फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात … The post सोलापूर : धावत्या ट्रकमधून किमती मालाची चोरी; आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक appeared first on पुढारी.

सोलापूर : धावत्या ट्रकमधून किमती मालाची चोरी; आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

टेंभुर्णी; Bharat Live News Media वृत्तसेवा : महामार्गावर चालत्या मालट्रकमधील किमती मालाची धाडसी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी आज (दि.२०) अटक केली. ही चोरी ८ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास वरवडे (ता.माढा) हद्दीत झाली होती. टेंभुर्णी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे मुद्देमालासह चौघांना जेरबंद केले. याप्रकरणी जिंदावली भोंगळे (वय ३२, रा.आझाद चौक लोहारा, जि.उस्मानाबाद) यांनी फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या टोळीकडून केबल वायरचे बंडल, एक आयशर टेम्पो, एक टाटा कंपनीचा लहान टेम्पो व साबणाचे बॉक्स असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिंदावली भोंगळे हे मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. पुणे येथील कंपनीतून किमती केबल वायरचे बंडल असलेला माल त्यांना विजयवाडा आंध्रप्रदेश येथे पोहोच करायचा होता. आपल्या मालट्रकमधून हा माल घेऊन जात असताना वरवडे गावच्या हद्दीत आले. यावेळी आंतरराज्य टोळीने डाव्या बाजूने हेड लाईट बंद करून आयशर टेम्पो ट्रकच्या आगदी जवळ नेला व ट्रकमधील ताडपत्री फाडून ट्रकमधील माल प्रवासादरम्यान ट्रकमध्ये भरत धाडसी चोरी केली.
पोलिसांनी वरवडे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर एक आयशर टेम्पो मागील दोन वर्षांपासून वारंवार पुणे-हैद्राबाद हायवेवर ये-जा करीत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या गुन्हातील आयशर टेम्पो (क्र-एपी-०९- एक्स-२२८३) पुन्हा टेंभुर्णीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी हा टेम्पो पकडला. टेम्पोतील श्रावनलाल विष्णूराम जाट (वय ३२), बुधाराम दुर्गाराम खुमोद (वय ३९) सुरेश बाबूलाल चौधरी (वय २८), राजुराम खिशालराम जाट (वय २९, चौघेही रा. बिलाडा, जि.पाली राजस्थान) यांना अटक करण्यात आली.  या आरोपींनी टेंभुर्णी हद्दीत विद्युत मोटारी चोरी केल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर भंडारा, पुणे, सोलापूर येथे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पो.अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पो अधिकारी अजित पाटील व टेंभुर्णी पोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोसई कुलदीप सोनटक्के व त्यांच्या पथकाने यशस्वी तपास केला आहे.
हेही वाचा :

Nashik Crime : एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या, सापळा रचून केली अटक

Dhule Crime News : छाईल गावात घरफोडी, 60 हजारांचा मुद्देमाल लंपास

औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त

Latest Marathi News सोलापूर : धावत्या ट्रकमधून किमती मालाची चोरी; आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.