Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा : मित्राने पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे. अनिकेत मुकुंद परदेशी (वय 28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नर्‍हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर, सौरभ रूपेश शिंदे (वय- 23, रा. … The post Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा appeared first on पुढारी.

Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा : मित्राने पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे. अनिकेत मुकुंद परदेशी (वय 28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नर्‍हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
तर, सौरभ रूपेश शिंदे (वय- 23, रा. आंबेगाव पठार, धनकवडी,पुणे) असे खून झालेल्या संबंधित तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रूपेश शिंदे (वय 49) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामीनारायण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत सौरभ शिंदे हा तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची ओळख पटवली. सौरभच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. सौरभ आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ आरोपीच्या घरी जेवण करीत होता. त्या वेळी त्याने अनिकेतच्या पत्नीबाबत अपशब्द बोलला. याचा राग मनात धरून अनिकेत याने सौरभला स्वामीनारायण मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने सौरभच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून त्याचा खून केला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव तपास करीत आहेत.
हेही वाचा
Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे वेडे राजकारणी: खा. कृपाल तुमाने
Tesla कधी करणार भारतात एंट्री; प्लांट कुठे? गुजरात की महाराष्ट्र, माहिती आली समोर
धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता
The post Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा appeared first on पुढारी.

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा : मित्राने पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे. अनिकेत मुकुंद परदेशी (वय 28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नर्‍हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर, सौरभ रूपेश शिंदे (वय- 23, रा. …

The post Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा appeared first on पुढारी.

Go to Source