भंडारा: कामगारांचा छळ संपेना, प्रशासनाला कीव येईना
भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा : कामगार विभागाकडून बांधकाम कामगारांना दिल्या जाणाºया स्वयंपाक किटचा घोळ अद्यापही संपलेला नाही. कामागार कार्यालयात स्वयंपाक किट मिळण्यासाठी जिल्ह्याभरातून दूर अंतरावरुन आलेल्या कामगारांचा अक्षरश: छळ सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असताना प्रशासनाला मात्र त्यांची कीव येत नाही. त्यामुळे कामागरांसह सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना स्वयंपाक किटचे वाटप करण्यात येत आहे. याआधी कामगारांना सेफ्टी किट देण्यात आल्या. मात्र स्वयंपाक किटचे वाटप करताना कामगारांना जनावरांसारखी वागणूक दिली जात आहे. हे पुरुष आणि महिला कामगार आपल्या मुलाबाळांसह येतात. कामागर कार्यालयासमोर भर उन्हात शेकडो कामगार रस्त्यावर उभे असतात. लहान मुलांना खाण्यापिण्याचीही भ्रांत राहत नाही. पुरुषांपेक्षा महिला कर्मचाºयांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर उभे असलेले कामगार अपघाताचे बळी ठरण्याची भीती आहे.
तालुकास्तरावरही बोजवारा
बांधकाम विभागाने जिल्हास्तरावर होत असलेले स्वयंपाक किटचे वाटप तालुकास्तरावर करण्यास सुरुवात केली. मात्र तालुकास्तरावरही या योजनेचा बोजवारा उडाला आहे. दोन दिवसांपूर्वी पवनी येथील वाटपात कंत्राटदाराने किट भरुन असलेला ट्रकच नियोजित ठिकाणावरुन दुसरीकडे पळवून नेल्याचा प्रकार घडला. त्यामुळे बांधकाम विभागाचा नियोजनशुन्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दलाल सक्रीय
ग्रामीण भागातून आलेल्या भोळ्याभाबड्या कामगारांना लवकर स्वयंपाक किट मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी खुद्द कामगारांनी केल्या आहेत. यासाठी दलालांची टोळी सक्रीय आहे. यामध्ये बांधकाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे किटच्या नावावर कामगारांचा सुरू असलेला छळ थांबवावा, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
हेही वाचा
भंडारा: मळणी यंत्रात डोके अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा : करडी आणि मुंढरी गावात पाण्यावरुन वादाला सुरुवात: पाणीपुरवठा योजना रखडली
भंडारा-गोंदिया लोकसभेची भाजपची वाट मोकळी; खा. प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेच्या उमेदवारीनंतर चित्र स्पष्ट
Latest Marathi News भंडारा: कामगारांचा छळ संपेना, प्रशासनाला कीव येईना Brought to You By : Bharat Live News Media.