‘कोहली’ने केली निवृत्तीची घोषणा! ‘विराट’सोबत जिंकला होता U-19 वर्ल्डकप

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli Announced Retirement : भारतीय क्रिकेट संघ नुकताच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरला पण सर्वांची मने जिंकली. याआधी टीम इंडियाने 5 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यापैकी एक विशेष विजय म्हणजे 2008 चा अंडर-19 विश्वचषक, जो टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्या स्पर्धेत एक कोहली कर्णधार होता … The post ‘कोहली’ने केली निवृत्तीची घोषणा! ‘विराट’सोबत जिंकला होता U-19 वर्ल्डकप appeared first on पुढारी.

‘कोहली’ने केली निवृत्तीची घोषणा! ‘विराट’सोबत जिंकला होता U-19 वर्ल्डकप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Kohli Announced Retirement : भारतीय क्रिकेट संघ नुकताच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरला पण सर्वांची मने जिंकली. याआधी टीम इंडियाने 5 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यापैकी एक विशेष विजय म्हणजे 2008 चा अंडर-19 विश्वचषक, जो टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्या स्पर्धेत एक कोहली कर्णधार होता आणि दुसरा एक कोहली संघासाठी सलामी देत ​​असे. त्याचे नाव तरुवर कोहली असे आहे. या क्रिकेटरने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे.
तरुवर कोहली हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे पण दुर्दैवाने त्याला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तिहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. नाबाद 307 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 53 राहिली. त्याने 14 शतकेही झळकावली.

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार!

कोण आहे तरुवर कोहली? (Kohli Announced Retirement)
तरुवर कोहली हा उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. तो उजव्या हाताने मध्यम गोलंदाजी करायचा. आयपीएल 2008 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले होते. त्यानंतर 2009 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा देखील भाग होता. तरुवरचे वडील सुशील कोहली हे जलतरणपटू होते.
तरुवर कोहलीने आयपीएलमध्ये त्याच्या फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए कारकिर्दीइतके चमत्कार केले नाहीत. त्यामुळे 2009-10 नंतर त्याचे नाव गायब होऊ लागले, त्यानंतर 2013 च्या रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी त्रिशतक झळकावून तो पुन्हा प्रकाशझोतात आला.

IND vs ENG Ranchi Test : रांचीच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड कसे आहे? जाणून घ्या आकडेवारी

तरुवर कोहलीचे रेकॉर्ड कसे आहे?
तरुवर कोहलीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावात 4573 धावा केल्या. त्याच्या नावावर 74 विकेट्सही आहेत. याशिवाय कोहलीने आपल्या लिस्ट ए करिअरमध्ये 72 सामने खेळताना 1913 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये, तरुवरने 14 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आणि 53.8 च्या सरासरीने धावा केल्या. याशिवाय त्याच्या नावावर 3 शतके, 11 अर्धशतकांसह 41 विकेट आहेत. (Kohli Announced Retirement)

IPL 2024 पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू जखमी; बाहेर पडण्याचा धोका

Latest Marathi News ‘कोहली’ने केली निवृत्तीची घोषणा! ‘विराट’सोबत जिंकला होता U-19 वर्ल्डकप Brought to You By : Bharat Live News Media.