अक्षय-टायगरच्या बडे मियाँ छोटे मियाँचे टायटल ट्रॅक रिलीज
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे ॲक्शन सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी ॲक्शन-पॅक फ्लिक ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधल टायटल ट्रॅक रिलीज झाले. (Bade Miyan Chote Miyan ) अक्षय आणि टायगर यांची खास केमिस्ट्री यातून बघायला मिळणार आहे. (Bade Miyan Chote Miyan )
संबंधित बातम्या –
Bade Miyan Chote Miyan : खिलाडी कुमार अक्षय आणि टायगरचे हटके टायटल ट्रॅक पोस्टर
Sunny Leone : सनी लिओनी “ग्लॅम फेम सीझन १ ची होणार परीक्षक
‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! रमेश वाणी तृतीयपंथी भूमिकेत
उत्तम अभिनयाच्या सोबतीने कमाल डान्स करणारी ही प्रसिद्ध ही जोडी जगभरातील चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. धडधडणाऱ्या बीट्स आणि मनमोहक लय ही या टायटल ट्रॅकची खासियत आहे. चित्रपटाच्या थरारक कथानकासह डान्स फ्लोअरवर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री यातून हायलाइट होणार आहे. दोघांनी या बद्दलचा उत्साह सोशल मीडिया वर शेयर केला आहे. विशाल मिश्रा यांचे आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं गायलं आहे. हे गीत इर्शाद कामिल यांनी लिहिलेले आहेत आणि बॉस्को-सीझर यांनी नृत्यदिग्दर्शित केले आहे.
पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित, बडे मियाँ छोटे मियाँमध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
View this post on Instagram
A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)
Latest Marathi News अक्षय-टायगरच्या बडे मियाँ छोटे मियाँचे टायटल ट्रॅक रिलीज Brought to You By : Bharat Live News Media.