वाशिम : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. Washim News वाशिम जिल्ह्य़ाला नदीजोड (वैनगंगा- नळगंगा ) प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, पीकविम्याची अॅग्रीम 25 टक्के व नियमित पीक वीमा शेतकऱ्यांना मिळवा. नाफेड व्दारा सोयाबीन खरेदी करावी. कृषीपंपाला … The post वाशिम : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण appeared first on पुढारी.

वाशिम : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण

वाशिम, Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. Washim News
वाशिम जिल्ह्य़ाला नदीजोड (वैनगंगा- नळगंगा ) प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, पीकविम्याची अॅग्रीम 25 टक्के व नियमित पीक वीमा शेतकऱ्यांना मिळवा. नाफेड व्दारा सोयाबीन खरेदी करावी. कृषीपंपाला मोफत व मुबलक वीज देण्यात यावी. रोही, रानडुक्कर, हरीण या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. ग्रामीण भागातील गोरगरीबांना मिळणाऱ्या घरकुल अनुदानात दुप्पट वाढ करून सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. अथवा जागेसाठी वेगळा निधीची तरतूद करावी. आदी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. Washim News
उपोषणसाठी भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, जिल्हाकार्यध्यक्ष बालाजी बोरकर बसले आहेत. आज विविध संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक शेतकरी व भूमिपुत्रच्या कार्यकर्त्यांनी अंदोलनास भेट दिली.
हेही वाचा 

वाशिममध्ये १० फेब्रुवारीपासून तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाटय
वाशिम: कारसाठी पैसे न दिल्याने नवविवाहितेचा गळा चिरून खून; पतीचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न
वाशिममध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

Latest Marathi News वाशिम : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण Brought to You By : Bharat Live News Media.