‘ही भूमिका खूपचं खास म्हणून स्वीकारली’

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी लिव्‍हची विशेष सिरीज ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’मध्‍ये जेनिफर विंगेट, करण वाही आणि रीम शेख हे डायनॅमिक त्रिकूट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या प्रतिभावान त्रिकूटासोबत अभिनेता संजय नाथ देखील आहे, जो स्‍वावलंबी व्‍यक्‍ती आणि टॉप क्रिमिनल वकिलांपैकी एक राजदीप रायसिंघानीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. राजदीप त्‍याच्‍या नीडर व्‍यक्तिमत्त्वासाठी, तसेच वकील … The post ‘ही भूमिका खूपचं खास म्हणून स्वीकारली’ appeared first on पुढारी.
‘ही भूमिका खूपचं खास म्हणून स्वीकारली’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोनी लिव्‍हची विशेष सिरीज ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’मध्‍ये जेनिफर विंगेट, करण वाही आणि रीम शेख हे डायनॅमिक त्रिकूट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या प्रतिभावान त्रिकूटासोबत अभिनेता संजय नाथ देखील आहे, जो स्‍वावलंबी व्‍यक्‍ती आणि टॉप क्रिमिनल वकिलांपैकी एक राजदीप रायसिंघानीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. राजदीप त्‍याच्‍या नीडर व्‍यक्तिमत्त्वासाठी, तसेच वकील म्‍हणून नेहमी विजयी ठरण्‍यासाठी ओळखला जातो. निर्दयी दृष्टिकोण पण हुशार असलेला राजदीप तीक्ष्‍ण व प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेला आहे.
संबंधित बातम्या –

Bade Miyan Chote Miyan : खिलाडी कुमार अक्षय आणि टायगरचे हटके टायटल ट्रॅक पोस्टर

Ishq Vishk Rebound Movie : रोहित सराफचा “इश्क विश्क रिबाउंड” यादिवशी रिलीज होणार

Rakul Preet Wedding : रकुल प्रीत सिंह -जॅकी भगनानीचे प्री-वेडिंग फोटो व्हायरल

ही भूमिका कशी स्वीकारली, याबाबत बोलताना संजय नाथ म्‍हणाले, ”निर्मात्‍यांनी मला या भूमिकेसाठी विचारले तेव्‍हा मला त्‍याबाबत खात्री नव्‍हती, कारण मी गेल्‍या १० वर्षांमध्ये या फॉर्मेटमधील शो कधीच केलेला नव्हता. मला ऑफर्स मिळाल्‍या नाहीत असे नाही, पण दीर्घकालीन सिरीजसाठी खूप वेळ लागतो आणि मी इतर प्रोजेक्‍ट्समध्‍ये बिझी होतो. पण, क्रिएटिव्‍ह टीमला माझ्या अभिनयामध्‍ये काहीतरी खास दिसले, जे अभिनेता म्‍हणून मला यापूर्वी कधीच जाणवले नाही. त्‍यांनी सतत विचारणा केल्‍यानंतर देखील मी सुरूवातीला संकोचलो. पण, काही ऑडिशन्‍स दिल्यानंतर मी ही संधी स्‍वीकारण्‍याचे ठरवले. रोचक बाब म्‍हणजे शोचे क्रिएटिव्‍ह दिग्‍दर्शक, लेखक व दिग्‍दर्शक भावना, अनुराधा आणि अनिरूद्ध २ ते ३ तास माझ्यासोबत बसले आणि त्‍यांनी मला शोबाबत त्‍यांचा दृष्टिकोण व्‍यक्‍त केला.
ज्‍यामुळे मी त्‍वरित भूमिकेचे पैलू व गुंतागुंतीशी जुडलो गेलो. या भूमिकेने मला मी कौतुक केलेल्‍या वेब सिरीजमधील लोगन रॉय आणि ब्‍लॅकलिस्‍टमधील रेमंड रेडिंग्‍टन सारख्‍या भूमिकांची आठवण झाली. या दोन्‍ही भूमिका साकारण्‍याची माझी इच्‍छा होती.”
‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’ सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता सोनी लिव्‍हवर पाहता येईल.
Latest Marathi News ‘ही भूमिका खूपचं खास म्हणून स्वीकारली’ Brought to You By : Bharat Live News Media.